शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यात नवीन ६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले; संख्या पोहचली ५६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 20:25 IST

गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.परराज्यात आणि बाहेर जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेले जिल्ह्यातील नागरिक,कामगार जिल्ह्यात दाखल होत आहे.त्यामुळे बधितांच्या संख्येत वाढ होत आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत 3 रुग्ण कोरोनामुक्त५३ क्रियाशील रुग्णविलगीकरणात ४५९ आणि अलगीकरणात ९४ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.परराज्यात आणि बाहेर जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेले जिल्ह्यातील नागरिक,कामगार जिल्ह्यात दाखल होत आहे.त्यामुळे बधितांच्या संख्येत वाढ होत आहे. नागपूरच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून आज २८ मे रोजी प्राप्त अहवालापैकी ६ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या ५६ इतकी झाली आहे.यामध्ये क्रियाशील रुग्ण ५३ इतके असून ३ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे.जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण १० एप्रिलला बरा होऊन घरी गेला तर उर्वरित दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना आज २८ मे रोजी सुट्टी देण्यात आली असून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे.त्यांना ७ दिवसाच्या गृह अलगीकरणात राहावे लागणार आहे.कोरोना विषाणूने जिल्हयात जे बाधित रुग्ण आढळले आहे त्यामध्ये १९ मे रोजी २ रुग्ण , २१ मे रोजी २७ रुग्ण,२२ मे रोजी १० रुग्ण, २४ मे रोजी ४ रुग्ण, २५ मे ४ रुग्ण , २६ मे रोजी १ रुग्ण, २७ मे रोजी १ रुग्ण आणि आज २८ मे रोजी ६ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे विषाणू चाचणी अहवालावरून आढळून आले आहे.ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येत आहे अशांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी भर्ती करण्यात येते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात.आतापर्यंत ९३४ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.त्यापैकी ५६ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह तर ८०० नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.६३ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.१५नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.गोंदिया येथील कोविड केअर सेंटर येथे २०८, आमगाव येथे १७,अजुर्नी /मोरगाव येथे ६०,सडक/अजुर्नी येथे ६८ ,नवेगावबांध येथे ३३,गोरेगाव येथे ३०, देवरी येथे ६ सरंडी/तिरोडा येथे १९,सालेकसा येथे १४ आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ४ असे एकूण ४५९ रुग्ण आज २८ मे रोजी सायंकाळी ६ वाजतापर्यंत भरती आहे.जिल्ह्यातील शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्र असलेल्या चांदोरी येथे १३ ,तिरोडा येथे १२, उपकेंद्र बिरसी येथे २ ,समाज कल्याण निवासी शाळा डव्वा येथे ११, जलाराम लॉन गोंदिया येथे विदेशातून आलेले ४,आदिवासी मुलांचे वसतिगृह, देवरी येथे ८,उपकेंद्र घटेगाव येथे ६,आदिवासी मुलांची आश्रमशाळा ईळदा येथे ३३ आणि येगाव येथे ५ असे एकूण ९४ व्यक्ती शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्रात उपचार घेत आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस