शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

जिल्ह्यात ५.९६ लाख मजुरांची नोंदणी!

By admin | Updated: December 10, 2015 01:59 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजूरांचे आधार कार्ड बनविण्यात गोंदिया जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर तर भंडारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आला आहे.

राज्यात गोंदिया दुसरा : तीन लाख मजुरांना आधारनरेश रहिले गोंदियामहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजूरांचे आधार कार्ड बनविण्यात गोंदिया जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर तर भंडारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आला आहे. नरेगाअंतर्गत होणाऱ्या कामात ज्या मजुरांनी आधार कार्डची नोंदणी केली त्यांची टक्केवारी ४७.९ टक्के आहे. नरेगाअंतर्गत सुरू असलेल्या कामांसाठी मजूरी हवी म्हणून गोंदिया जिल्ह्यातील तब्बल ५ लाख ९६ हजार ६७३ लोकांनी आपली नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील लोकसंख्या १३ लाखाच्या घरात असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर मजुरांची नोंदणी होणे ही बाब आश्चर्यकारक ठरत आहे.नोंदणी केलेल्या एकूण मजुरांपैकी २ लाख ३५ हजार ६०१ मजुरांकडे आधार कार्ड आहे. यातील दोन लाख २१ हजार ५३२ लोकांच्या आधार कार्डाची पुनर्तपासणी झाली आहे. दोन लाख ३५ हजार ६०१ मजूरांनी बँकेत खाते उघडले आहे. डाकघरात खाते उघडणाऱ्या मजुरांची संख्या २६१० आहे.४८१४ कुटुंबांनी मागितले कामजिल्ह्याच्या आठ तालुक्यातील चार हजार ८१४ कुटुंबानी डिसेंबर महिन्यात काम मागितले आहे. यात आमगाव २१७, अर्जुनी-मोरगाव ५११, देवरी ४७८, गोंदिया ११२६, गोरेगाव २४२, सडक-अर्जुनी १०३३, सालेकसा ४२४ व तिरोडा तालुक्यातील ७८३ कुटुंबाचा समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात ४ हजार २५३ कुटुंबाच्या हाताला काम देण्यात आले.राज्यापेक्षा जिल्ह्याची टक्केवारी अधिकराज्यात नरेगाअंतर्गत होत असलेल्या कामावर मजुरी मिळावी यासाठी एक कोटी ९१ लाख ९७ हजार ७५८ मजुरांनी नोंदणी केली आहे. यातील ४७ लाख ९४ हजार १२३ मजूरांकडे आधार कार्ड आहे. यापैकी बँक किंवा पोस्ट खात्यात खाते उघडणाऱ्या मजुरांची टक्केवारी राज्यात २५.२८ टक्के असली तरी गोंदिया जिल्हाची आकडेवारी ४७.९ अशी आहे.७४८ कामे झाली पूर्णजिल्ह्यात नरेगांतर्गत १११० कामे मंजूर केली. मागील वर्षी ४३९ व यावर्र्षी ३८१ कामे मंजूर झाली. ७४८ कामांना मंजूरी मिळाली होती. ती कामे पुर्ण झाली आहेत. यात आमगाव तालुक्यात १९९, अर्जुनी-मोरगाव २९, देवरी ८, गोंदिया १३४, गोरेगाव १९०, सडक-अर्जुनी ६२, सालेकसा ६५ व तिरोडाच्या ६१ कामांचा समावेश आहे.