शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

५७ हजार शेतकऱ्यांची धान विक्रीसाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 05:00 IST

जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत धान खरेदी केली जाते. रब्बीतील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यंदा १०७ धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. रब्बीतील धान विक्रीसाठी जिल्ह्यातील ६८२८० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.  मात्र रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी यंदा प्रथमच केंद्र शासनाने ४ लाख ७९ हजार क्विंटलची मर्यादा ठरवून दिल्याने धान खरेदीची प्रक्रिया संकटात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदीच्या मर्यादेचा तिढा अद्यापही सुटला नसल्याने खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. आतापर्यंत केवळ २७ धान खरेदी केंद्र सुरु झाले असून १२४७ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे. तर अजूनही ५७ हजार शेतकरी धानाच्या विक्री करण्यासाठी प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत धान खरेदी केली जाते. रब्बीतील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यंदा १०७ धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. रब्बीतील धान विक्रीसाठी जिल्ह्यातील ६८२८० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मात्र रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी यंदा प्रथमच केंद्र शासनाने ४ लाख ७९ हजार क्विंटलची मर्यादा ठरवून दिल्याने धान खरेदीची प्रक्रिया संकटात आली आहे. त्यामुळेच आतापर्यंत १०७ पैकी केवळ २७ धान खरेदी सुरु झाले असून या केंद्रावरुन ५७ हजार क्विंटल धान खरेदी झाली आहे. तर ८० धान खरेदी संस्थानी अद्यापही केंद्र सुरु केलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली असून गरजेपोटी त्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने धान विक्री करावा लागत आहे. 

मागील वर्षी २८ मे पर्यंत १३ लाख क्विंटल धान n मागील वर्षी रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने एकूण २३ लाख क्विंटल धान खरेदी केली होती. तर २७ मे पर्यंत १३ लाख क्विंटल धान खरेदी झाली होती. तर यंदा फारच बिकट स्थिती असून आतापर्यंत केवळ ५८ हजार क्विंटल धान खरेदी झाली आहे. त्यामुळे लाखो क्विंटल धान शेतकऱ्यांच्या घरात पडला असल्याचे चित्र आहे. 

उन्हाळ्यातील धान पावसाळ्यात विकायचा का ?- रब्बी हंगामातील धान खरेदीच्या मर्यादेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे धान खरेदीच्या प्रक्रियेला अद्यापही वेग आलेला नाही. तर खरीप हंगामाला सुरुवात झाली असून खते, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. पण रब्बीतील धान खरेदी सुरु न झाल्याने घरात तसाच पडला आहे. तर पावसाळ्याला सुरुवात होत असल्याने उन्हाळ्यातील धान पावसाळ्यात विकायचा का असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे.

३० लाख क्विंटल उत्पादन - यंदा रब्बी हंगामात धानाचे विक्रमी उत्पादन झाले असून हेक्टरी ४३ क्विंटल धानाचे उत्पादन झाल्याचे अंदाजीत आकडेवारी कृषी विभागाने काढली आहे. रब्बीत ६८ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. त्यातून जवळपास ३० लाख क्विंटल धानाचे उत्पादन झाले आहे. तर केंद्र सरकारने केवळ ४ लाख ७९ हजार क्विंटल धान खरेदीला मंजुरी दिली असल्याने २५ लाख क्विंटल धान विकायचा कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. 

खरीप हंगाम तोंडावर आहे, खते, बियाणे यांची जुळवाजुळव करण्यासाठी पैशाची गरज आहे, पण रब्बीतील धानाची विक्री न झाल्याने कर्जासाठी सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.- मेघशाम पटले, शेतकरी 

मी रब्बी पाच एकरवर धानाची लागवड केली होती. या धानाची विक्री करुन खरिपाच्या तयारीला लागणार होतो. पण रब्बीतील धान घरात तसाच पडून असल्याने हंगाम करायचा कसा असा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.- विलास दमाहे, शेतकरी

केंद्र सरकारने आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता धान खरेदीची मर्यादा वाढवून देत त्वरित धान खरेदी सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारु.- राजेंद्र जैन, माजी आमदार 

रब्बीतील धान खरेदीवर शासनाने त्वरित तोडगा काढून धान खरेदीची समस्या मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. - विनोद अग्रवाल, आमदार 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड