गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण व शहरी भागासाठी आ. गोपालदास अग्रवाल यांच्या स्थानिक विकास निधीतून ४४ लाख रूपयांचे विकास कार्ये मंजूर झाली आहेत. या विकास कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता वेनू मंजुरी दिली आहे.यामध्ये मुंडीपार येथे सिमेंट क्राँक्रिट रस्ता बांधकाम ( एक लाख रूपये), गोंडीटोला-कटंगीकला येथे चावडी बांधकाम ( एक लाख २५ हजार रूपये), मोरवाही येथे सभामंडप बांधकाम (एक लाख ९६ हजार रूपये), डांगोरली येथे ईसा मसीह केंद्राजवळ सभामंडप बांधकाम (दोन लाख रूपये), नवरगाव खुर्द येथे जि.प. हायस्कूलच्या आवारभिंतीचे बांधकाम (एक लाख ९७ हजार रूपये), गोंदिया शहरातील मरारटोली येथे सभामंडप बांधकाम (१० लाख रूपये), गोंदिया शहरातील वार्ड-८ मध्ये मालविय शाळेजवळ हनुमान मंदिर चावडी बांधकाम (दोन लाख रूपये), मंगरूटोला-लंबाटोला येथे चावडी बांधकाम (एक लाख ५० हजार रूपये), सतोना येथे सीडी वर्क बांधकाम (एक लाख रूपये) व बनाथर येथे सभामंडप बांधकाम (चार लाख रूपये) या कामांना मंजुरी मिळाली आहे.तसेच गोंदिया शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम परिसर, गांधी वार्ड, सिव्हील लाईन्स, नूरी मशिद मागे, सिंगलटोला येथे मेश्राम यांच्या घराजवळ, छोटा गोंदिया येथे पटले यांच्या घराजवळ, रतनारा येथे कांता डोंगरे यांच्या घराजवळ, पिंडकेपार येथे रमेश बरवे यांच्या घराजवळ, अंभोरा येथे चौधरी यांच्या घराजवळ, बटाना येथे विनायक लांजेवार यांच्या घराजवळ, रायपूर येथे परदेश जमरे यांच्या घराजवळ, पांगळी येथे बल्लुसिंग नागभिरे यांच्या घराजवळ, सिरपूर येथे ग्रामपंचायत क्षेत्रात, चुलोद येथे खडकसिंग बघेले यांच्या घराजवळ, चुलोद येथील वार्ड-२ मधील प्रकाश बसेना यांच्या घराजवळ, सावरी-लोधीटोला येथे आदिवासी मोहल्ला प्रत्येकी एकेक अशा एकूण १५ विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. कार्यांच्या मंजुरीसाठी नगराध्यक्ष गोविंद शेंडे, न.प. बांधकाम सभापती राकेश ठाकूर, नगरसेवक व्यंकट पाथरू, सुनील भालेराव, रमेशकुमार लिल्हारे, रूद्रसेन खांडेकर, अर्जुन नागपुरे, मीना सोयाम, मुनेंद्र नांदगाये, पं.स. सभापती सरिता अंबुले, उपसभापती चमन बिसेन आदींनी आ. अग्रवाल यांचे आभार मानले. (प्रतिनिधी)
४४ लाखांचे विकास कार्ये मंजूर
By admin | Updated: April 30, 2015 00:57 IST