शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

७५ हजार विद्यार्थ्यांचे गणवेशाचे पैसे अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 21:27 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातात. यासाठी एका गणवेशासाठी ३०० रूपये असे दोन जोड गणवेशासाठी ६०० रूपये एका विद्यार्थ्यामागे शासन देते. परंतु यंदा एकाच गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीला वळती करण्यात आले.

ठळक मुद्देविद्यार्थी गणवेशापासून वंचित : एकच गणवेशाचे दिले पैसे

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातात. यासाठी एका गणवेशासाठी ३०० रूपये असे दोन जोड गणवेशासाठी ६०० रूपये एका विद्यार्थ्यामागे शासन देते. परंतु यंदा एकाच गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीला वळती करण्यात आले. परंतु ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना गणवेशाचा दुसरा जोड देण्यासाठी आतापर्यंत शासनाने पैसे दिलेच नसल्याची बाब पुढे आली आहे.गोंदिया जिल्हा आदिवासी आणि नक्षलग्रस्त आहे. येथील दुर्गम भागात राहणाºया व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शासनाने प्रत्येकी दोन जोड गणवेश देण्याचे ठरविले. एका गणवेशासाठी ३०० रूपये दिले जातात. शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळा व्यवस्थापन समित्यांना गणवेशाचे पैसे देणे अपेक्षीत होते. परंतु शाळा सुरू होऊन महिना होत असताना आतापर्यंत फक्त एकाच गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समित्यांना वळती करण्यात आले आहेत. त्यातही अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले नाही. गणवेशाच्या दुसºया जोडसाठी रक्कम शासनाकडून शिक्षण विभागाला आलीच नाही. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना गणवेशाचे पैसे देण्यात आले नाही.गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षण घेणाऱ्या ४१ हजार ५३६ मुली, अनुसूचित जातीतील चार हजार ५४४ मुले, अनुसूचित जमातीतील सहा हजार ७१९ मुले व दारिद्रय रेषेखालील २२ हजार ४७७ मुले अशा एकूण ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन जोड गणवेश द्यायचे होते. दोन जोड गणवेशांपैकी एका गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितींच्या खात्यात जमा केल्याचे सर्वशिक्षा अभियानाचे कर्मचारी सांगत आहेत. परंतु अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटपच झाले नसल्याची बाब पुढे आली आहे. गणवेशाचे पैसे मिळाले तर विद्यार्थ्यांना निदान एक गणवेश तरी आतापर्यंत का देण्यात आला नाही. गणवेशाच्या दुसऱ्या जोडसाठी शासनाकडून कार्यवाही करण्यात आली नाही.दोन कोटी २६ लाखांची गरजजिल्ह्यातील ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना गणवेशाचा दुसरा जोड देण्यासाठी दोन कोटी २५ लाख ८२ हजार ८०० रूपयांची गरज आहे. एवढा निधी शासनाने पाठविल्याशिवाय दुसरा जोड विद्यार्थ्यांना देता येणार नाही. एका गणवेशामागे ३०० रूपये शासन देत आहे. परंतु तेही गणवेशाची रक्कम शाळा सुरू होऊनही दिली नसल्याने काही ठिकाणचे विद्यार्थी आठवडाभर एकाच गणवेशात शाळेत जातात. तर काही ठिकाणी व्यवस्थापन समित्यांकडून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केलेले नाही.

टॅग्स :Schoolशाळा