शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

४० टक्के कुटुंब शौचालयांविना

By admin | Updated: October 16, 2015 02:34 IST

जिल्ह्यात तब्बल ४० टक्के, अर्थात ९० हजार कुटुंबात वैयक्तिक शौचालय नाहीत. त्यामुळे या नागरिकांना उघड्यावर शौचविधीसाठी जावे लागते.

सुधारित कृती आराखडा : यावर्षी १०३ गावांमधील १४ हजार १३१ कुटुंबांना अनुदानमनोज ताजने गोंदियाजिल्ह्यात तब्बल ४० टक्के, अर्थात ९० हजार कुटुंबात वैयक्तिक शौचालय नाहीत. त्यामुळे या नागरिकांना उघड्यावर शौचविधीसाठी जावे लागते. शासनाच्या निर्मल ग्राम योजनेचा फज्जा उडविणारी ही वस्तुस्थिती आहे. मात्र ही स्थिती सुधारण्यासाठी सुधारित वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार यावर्षी १०३ गावांमधील १४ हजार १३१ कुटुंबात वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून निर्मल ग्राम अभियान राबविले जात आहे. गावे हगणदारीमुक्त व्हावेत आणि प्रत्येक कुटुंबात शौचालय बांधून त्याचा वापर व्हावा यासाठी हे अभियान राबविण्यात आले. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून शौचालय बांधणीसाठी अनुदानही देण्यात आले. मात्र गोंदिया जिल्ह्यातील शौचालयांची स्थिती पाहता हे अभियान जिल्ह्यात किती यशस्वी झाले यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.जिल्ह्यात ९० हजार कुटुंबांत अजूनही शौचालय नसले तरी सुधारित वार्षिक कृती आराखड्यानुसार यावर्षी केवळ १४ हजार १३१ कुटुंबात शौचालय बांधण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. यापूर्वी सरसकट कोणालाही शासनाचे अनुदान दिले जात होते. मात्र ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ मधील १०३ गावांमधील दारिद्र्य रेषेवरील सर्वसाधारण गटात मोडणारे कुटुंब सोडून बाकी कुुटुंबांना १२ हजार रुपये प्रतिकुटुंब अनुदान दिले जाणार आहे. त्यात ८ हजार रुपये केंद्र सरकारचा तर ४ हजार रुपये राज्य सरकारचा वाटा आहे.सुधारित कृती आराखड्यानुसार आठही तालुक्यातील १०३ गावांमधल्या ६५८३ बीपीएल कुटुंबांमध्ये शौचालय बांधण्याचे उद्दीष्ट आहे. त्यात एससी प्रवर्गातील ८७४, एसटी ११९० आणि इतर ४५१९ कुटुंबांचा समावेश आहे. याशिवाय एपीएल (दारिद्र्य रेषेवरील) ५८४९ कुटुंबांमध्ये यावर्षी शौचालय बांधणीचे उद्दीष्ट ठरविण्यात आले. सुधारित कृती आराखड्यानुसार यावर्षी सर्वाधिक २८२९ शौचालय बांधण्याचे उद्दीष्ट तिरोडा तालुक्याला देण्यात आले. त्याखालोखाल सालेकसा २८१७, गोंदिया २८०८, गोरेगाव १३५५, आमगाव १३०२, सडक अर्जुनी १२७९, देववी ८७८ तर अर्जुनी मोरगाव तालुक्याला ८६३ शौचालय बांधण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.