शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ३९१ चिमुकल्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:19 IST

जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील व आदिवासी भाग आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता पाहिजे त्या प्रमाणात आरोग्याविषयक काळजी घेताना दिसत नाही. शहरातही काही प्रमाणात हेच वातावरण असून परिणामी सन २०१७-१८ या वर्षभरात शून्य ते १ वर्षातील ३९१ चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देशहरात २२८ मृत्यू : गंगाबाई रूग्णालयाचा आकडा वाढता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील व आदिवासी भाग आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता पाहिजे त्या प्रमाणात आरोग्याविषयक काळजी घेताना दिसत नाही. शहरातही काही प्रमाणात हेच वातावरण असून परिणामी सन २०१७-१८ या वर्षभरात शून्य ते १ वर्षातील ३९१ चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. यावरून शून्य बालमृत्यू अभियानाचा जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे दिसत आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात ४७ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. तिरोडा तालुक्यातील ग्रामीण भागात १८ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. गोरेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात ३८ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. आमगाव तालुक्यातील ग्रामीण भागात ८ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. सालेकसा तालुक्यातील ग्रामीण भागात १३ चिमुकल्यांचा मृत्यू झाला.देवरी तालुक्यातील ग्रामीण भागात ५ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्रामीण भागात २० चिमुकल्यांचा तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात १४ चिमुकल्यांचा मृत्यू झाला झाला आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांत वर्षभरात १६३ चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. परंतु तिरोडा व गोंदिया या दोन शहरांत चिमुकल्यांच्या मृत्यूची आकडेवारी सर्वाधीक आहे. येथे २२८ चिमुकल्यांचा वर्षभरात मृत्यू झाला असून ग्रामीण भागापेक्षा दुप्पट मृत्यू शहरी भागात झाले आहे. यात येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात सर्वाधीक चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्याचा बालमृत्यू दर २२.२० टक्केजिल्ह्यातील गर्भवती महिलांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे बालमृत्यू दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात १७ हजार ९०० महिलांची प्रसूती करण्यात आली. यातील १७ हजार ६१६ बाळ सुखरूप आहेत. तर ३९१ चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून हा दर २२.२० टक्के आहे. शासनाने शून्य माता व बालमृत्यू अभियान सुरू केले. परंतु या अभियानाची उत्तम अंमलबजावणी न झाल्यामुळे बालमृत्यू दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.आहाराकडे दुर्लक्षगर्भावस्थेत महिलांना संतुलीत आहार दिला जात नाही. शिवाय वेळोवेळी आरोग्य तपासणी होत नसल्यामुळे महिलांच्या पोटात असलेले अर्भक कुपोषीत होतात. त्यामुळे कमी वजन व शरीराची योग्यरित्या वाढ न झाल्यामुळे अर्भक मृत्यूदर वाढत आहे. बाल विकास विभागातर्फे दिला जाणारा आहार चवीष्ट नसल्यामुळे महिला मंडळी तो आहार जनावरांना देत असल्याची माहिती आहे.वांगाभातमुळे वाढतेय कुपोषणगोंदिया जिल्हा आदिवासी असल्यामुळे येथील लोक पाहिजे त्या प्रमाणात आरोग्याची काळजी घेत नाही. गर्भवती महिला वांगे, आळण, कढी अशा एकेरी भाज्यांवरच दिवस काढतात. अनेक महिलांना गर्भावस्थेच्या पूर्ण काळात पोळी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचे वजन सुरूवातीपासून कमीच असते. त्यातून कुपोषण वाढत आहे.

टॅग्स :Deathमृत्यू