शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

डिजिटल जिल्ह्यातील ३६० शाळा अप्रगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 21:37 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत या शर्तीने पुढे राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. याअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील १०६९ शाळा डिजिटल झाल्या व जिल्हा डिजिटलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहीला.

ठळक मुद्देप्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न अधुरे: मूलभूत क्षमतेत ७५ तर अभ्यासक्रमावर ६० टक्के गुण

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत या शर्तीने पुढे राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. याअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील १०६९ शाळा डिजिटल झाल्या व जिल्हा डिजिटलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहीला. मात्र डिजीटल जिल्ह्यातील ३६० शाळा अजूनही अप्रगत आहेत. २५ मुद्द्यांच्या निकषांवरून शाळा प्रगत ठरविण्यात येते. अप्रगत शाळांची संख्या बरीच आहे. १४ जुलै २०१७ रोजी आलेल्या नविन आदेशानुसार उर्वरीत शाळा प्रगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षण देणे ही राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. अध्ययन संपादणूक सर्व्हेक्षणाच्या अहवालानुसार अपेक्षित अध्ययन निष्पत्ती प्राप्त न झाल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २२ जून २०१५ रोजी एक शासन निर्णय काढून अप्रगत शाळांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाला कृतीत उतरवून प्रगत शिक्षणात गोंदिया जिल्हा प्रथम असावा यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग काम करीत होते.शासनाने शाळा बोलक्या करण्यासाठी २५ निकष ठेवले होते. परंतु शासनाने १४ जुलै २०१७ ला काढलेल्या शासन निर्णयामुळे आता त्या २५ निकषांना शिथील करण्यात आले असून मूलभूत क्षमतेत ७५ टक्के गुण व अभ्यासक्रमावर आधारीत ६० टक्के गुण घेणाºया विद्यार्थ्यांस प्रगत समजले जाणार आहे. आधी विद्यार्थी प्रगत, वर्ग प्रगत व शाळा प्रगत केली जात आहे. ज्या शाळेतील ६० टक्के विद्यार्थी प्रगत झाले त्या शाळेला प्रगत समजण्यात येत आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ३६० शाळा अजूनही अप्रगत आहेत.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष६ ते १४ वयातील बालकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, १०० टक्के विद्यार्थी प्रगत करणे, प्रत्येक शाळेला स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करून देणे, शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पकतेला वाव, शैक्षणिक साहित्यावर भर, अप्रगत मूलविहीन शाळा करणे, विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्यनावर भर, विद्यार्थ्यांना कृतीद्वारा शिक्षण घेणे, कठिण विषयांविषयी आवड निर्माण करणे, शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भिती नाहीशी करणे, शाळा सुंदर करून विद्यार्थ्यांची शाळेविषयी आवड निर्माण करणे, सोप्या व सुलभ पध्दतीने ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेत वाढ करणे, सर्वांगिण विकास करणे व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे काम या उपक्रमातून करायचे आहे.४३.६८ शाळा अप्रगतविद्यार्थ्यांना प्रगत करण्याची शर्यत जि.प. शाळांमध्ये लागली होती. परंतु आता याकडे दुर्लक्ष करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील २० शाळा अप्रगत आहेत. देवरी ५३, गोंदिया ७४, गोेरेगाव १७, सालेकसा ४२, सडक-अर्जुनी ५७, तिरोडा ५७ व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४० शाळा अप्रगत आहेत. जिल्ह्यातील ७०९ शाळा प्रगत असून त्यांची टक्केवारी ६६.३२ आहे.

टॅग्स :educationशैक्षणिक