शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

३५ हजार नागरिकांनी धरली ग्रामगीतेची कास

By admin | Updated: October 11, 2015 00:55 IST

‘ग्रामगीते’च्या माध्यमातून मानवतेची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ५० वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले विचार आजच्या समाजातही तंतोतंत लागू पडतात.

विविध टप्प्यात देताहेत परीक्षा : ३५० शाखांमधून राष्ट्रसंतांच्या साहित्याचा प्रचारनरेश रहिले गोंदिया‘ग्रामगीते’च्या माध्यमातून मानवतेची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ५० वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले विचार आजच्या समाजातही तंतोतंत लागू पडतात. त्यांच्या विचारांनी प्रेरीत झालेल्या तत्कालीन पिढीतील गुरूदेव सेवा मंडळाचे प्रचारक त्यांच्या विचारांचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवित आहेत. गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रसंतांच्या विचारधारेवर चालणारे ३५ हजार लोक असून आजही त्यांच्या साहित्याचे वाचन करून ग्रामगीताचार्य पदवी मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कीर्तनातून प्रेरणा मिळालेले जिल्ह्यातील त्यावेळचे बालक आताचे जेष्ठ नागरिक आहेत. आताही ते गावागावांत गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून जनजागृती करतात. व्यसनाधीनता, दारू, गांजा, चोरी यावर तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या भजनांच्या माध्यमातून जनजागृती करतात. भ्रूणहत्या, आत्महत्या करु नका असा संदेश देत शरीर स्वच्छतेबाबत वैचारिक दृष्टीकोन बदलविण्यासाठी राष्ट्रसंतांची ग्रामगीता, लहर की बरखा, अभंग, विविध भजनांची पुस्तके समग्र वाङमयाच्या माध्यमातून प्रबोधन करणे सुरू आहे. ग्रामगीताचार्य परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी प्रवीण परीक्षा, ग्रामनाथ, ग्रामरत्न ह्या परीक्षा आधी उत्तीर्ण कराव्या लागतात. वर्ग ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा आतापर्यंत १५ हजार बालकांनी ही परीक्षा दिली आहे. वर्ग ८ ते १० वी च्या विद्यार्थ्यांना परिचय परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा १० हजार बालकांनी दिलेली आहे. दहावीनंतरच्या लोकांसाठी गट क्र.३ मध्ये प्रवीण परीक्षा घेतली जाते. दहा हजार लोकांनी ही परीक्षा आतापर्यंत दिली आहे. ग्रामनाथ ही परीक्षा २००० लोकांनी दिली आहे. त्यानंतर घेण्यात येणारी ग्रामरत्न परीक्षा २०० लोकांनी दिली आहे, तर ग्रामगीताचार्य ही परीक्षा सात जणांनी उतीर्ण केली आहे.