शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखान्यात जाणाऱ्या ३४ जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:10 IST

गोरेगाव पोलिसांनी शनिवारी (दि.१५) केलेल्या दोन कारवाईत पाच वाहनांमधून ३४ जनावरांची सुटका करण्यात आली. पहिली कारवाई रात्री ८ वाजता पाथरी येथे तर दुसरी कारवाई रात्री १० वाजता बबई ते मोहाडी रस्त्यावर रात्री १०.३० वाजता करण्यात आली.

ठळक मुद्दे१८ जणांवर गुन्हा दाखल : ४८ लाख ४० हजारांचा माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव पोलिसांनी शनिवारी (दि.१५) केलेल्या दोन कारवाईत पाच वाहनांमधून ३४ जनावरांची सुटका करण्यात आली. पहिली कारवाई रात्री ८ वाजता पाथरी येथे तर दुसरी कारवाई रात्री १० वाजता बबई ते मोहाडी रस्त्यावर रात्री १०.३० वाजता करण्यात आली. पकडलेल्या जनावरांना पिंपळगाव येथील गौशाळेत पाठविण्यात आले.गोरेगाव येथे बुधवारला बैल बाजार भरतो तर आमगाव येथे शुक्रवारला बाजार भरतो. त्यामुळे बाजाराच्या दुस-या दिवशी आमगाव ते ठाणा मार्गे तिरोडा,व चिल्हाटी पंचवटी मार्गे नागपूर अशी जनावरांची वाहतूक केली जाते. पाथरी व पंचवटीत पोलिसांनी या कत्तलखान्यात जाणा-या जनावरांना पकडले. ट्रक एमएच ३५ ए.जे. ५६१ मध्ये ८ म्हैस व १० रेडे डांबून वाहतूक करण्यात येत होती.या प्रकरणात १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक एमएच ३५ ए.जे. ५६१ चा चालक मोहमद आरीफ मोहम्मद खलीत (३०) रा. टेकानाका नागपूर, संजय हरिचंद कोहरे (३५) रा. मोहनटोला, आमगावच्या कुंभारटोली येथील १० वर्षाचा बालक, दुर्गेश प्रकाश मोहबे (२२) रा. कुंभारटोली आमगाव व वशीम नाशीम कुरेशी (२४) रा. आमगाव यांना पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्या मालाची किंमत २१ लाख रूपये सांगितली जाते. त्यानंतर रात्री १०.३० वाजता बबई ते मोहाडी या रस्त्यावर एम.एच.३४ पी.जी. १००५, एम.एच.३४ ए.बी. ००४३, एम.एच.२८ ए.बी. ५६०२, एम.एच.३१ बी.एच.३३४२ या चार वाहनांमध्ये १६ जनावरे डांबले होते. जनावरे व जप्त करण्यात आलेल्या वाहनांची किंमत २० लाख ४० हजार रूपये सांगितली जाते.या प्रकरणात कोठारी येथील प्रदीप बाबाराव गिरूळकर (२२), राकेश आनंदराव डोंगरवार (२१), अतुल जागेश्वर कावळे (२९), सचिन चंदू शेंडे (३०), राधेश्याम भाऊजी हिवरे, परसोडी येथील मनोज चन्नेकर, गोरेगाव येथील विक्रम नरेश सुकारे (२२), संतोष श्रीराम राईत (२५), नरेश सदाशिव सुकारे, सम्राट कांतीलाल येवले (२७), राम इसन मेश्राम (४०), दीपांकर रामदास वालदे व पंचवटी येथील साहेबराव ठाकूर यांच्यावर प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१) सहकलम ७,९ महाराष्टÑ पशूसंवर्धन अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस