शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

केंद्राकडून कचारगडसाठी ३.२६ कोटी

By admin | Updated: February 23, 2016 02:18 IST

कचारगड देवस्थानाचा पर्यटनच्या दृष्टीने विकास करण्यासाठी केंद्र शासनाच्या आदिवासी विभागाकडून तीन कोटी २६

सालेकसा : कचारगड देवस्थानाचा पर्यटनच्या दृष्टीने विकास करण्यासाठी केंद्र शासनाच्या आदिवासी विभागाकडून तीन कोटी २६ लाख मंजूर करण्यात आले असून येत्या मार्च अखेर तो निधी कचारगडच्या विकासासाठी उपलब्ध होईल, अशी माहिती खा. अशोक नेते यांनी गोंडवाना महासंमेलनादरम्यान मार्गदर्शन करताना दिली.गोंडवाना महासंमेलनाचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून आर्णिचे आ. तोडसाम, गोंडराजे वासुदेव शाह टेकाम, भाजप नेते राकेश शर्मा, जि.प. सदस्य विजय टेकाम, गोंडी धर्माचार्य दादा हिरसिंह मरकाम, शेरसिंह आचला यांच्यासह अनेक राज्यातून आलेले आदिवासी समाजाचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, सालेकसाचे तहसीलदार प्रशांत सांगळे, प्रभारी प्रकल्प अधिकारी मीनाक्षी उन्हाळे व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सर्व प्रथम भूमकाल यांनी १२ सगापेन व ७५० गणगोत पूजा करुन उद्घाटन महोदयांना दीप प्रज्वलित करण्यात लावले. संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमगावचे आमदार संजय पुराम यांनी हळदीचा पिवळा टीेका लावून अतिथीचे स्वागत केले.या प्रसंगी खा. नेते म्हणाले की गोंडी संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती असून यात पर्यावरण रक्षणासाठी विशेष भर दिला जातो. खऱ्या अर्थाने आदिवासी समाज हा नैषर्गिक संपत्तीचा रक्षण कर्ता आहे. म्हणून त्यांच्या श्रद्धास्थाने विकास करणे गरजेचे आहे. त्यामुळे आदिवासीचे सुद्धा विकास होईल. याप्रसंगी ना. बडोले म्हणाले की संस्कृती व परंपरा जपण्यामध्ये आदिवासी समाज सदैव तत्पर राहीला आहे. मागासलेला असला तरी निषर्गातील संपत्तीचे रक्षण करणे, परंपराच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोण जोपासणे या समाजाला माहित आहे. आ. पुराम म्हणाले कचारगडच्या विकासातच आदिवासीचा विकास लपलेला आहे. त्यामुळे सर्वांनी कचारगडच्या विकासात सहकार्य करण्याची गरज आहे. कचारगड आता विकासाचा वाटेवर आला असून येणाऱ्या काळात निश्चित याचा कायापालट होणार यात शंका नाही. प्रास्ताविक मांडताना कचारगड समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी कचारगडच्या विकासासाठी शासन स्तरावरील ठोस पाऊले उचलण्याची गरज असल्याचे मत प्रकट केले. उपस्थित पालक मंत्री, खासदार, आमदार यांना निवेदन केले की या परिसरात वर्षभर पिण्याच्या पाण्याची वीजेची व आरोग्याची सेवा मिळावी यासाठी ठोस उपाय योजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाला समितीचे माजी अध्यक्ष शंकलाल मडावी, भाजप अध्यक्ष परणसराम फुंडे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, बाबा लिल्हारे, राजेंद्र बडोले, चंद्रलेखा कंगाली, संस्थापक गोपालसिंह उईके, आदी उपस्थित होते. संचालक पर्वतसिंह कंगाली यानी केले. आभार सचिव संतोष पंधरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष रमणलाल सलाम, मनिष पुसाम, बारेलाल वरकडे, सुरेश परते, रामेश्वर पंधरे, शकुनतला परते, मनोज इळपाते, राधेश्याम टेकाम, विरेंद्र उईके आदिनी परिश्रम घेतले.(तालुका प्रतिनिधी)