शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

३२ वर्षांनंतरही पिंडकेपार प्रकल्पाच्या समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:25 AM

पिंडकेपार लघू सिंचन प्रकल्प ३२ वर्षांनंतरही पूर्ण होवू शकला नाही. वन कायद्यामुळे प्रकल्पाच्या कामात अडथळे उत्पन्न होत आहेत. आता वन कायद्याच्या समस्या संपुष्टात आल्यावरही या प्रकल्पाच्या समस्या कमी न होता कायम आहेत.

ठळक मुद्दे४० कोटींपैकी फक्त १२ कोटी खर्च : सुधारित प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पिंडकेपार लघू सिंचन प्रकल्प ३२ वर्षांनंतरही पूर्ण होवू शकला नाही. वन कायद्यामुळे प्रकल्पाच्या कामात अडथळे उत्पन्न होत आहेत. आता वन कायद्याच्या समस्या संपुष्टात आल्यावरही या प्रकल्पाच्या समस्या कमी न होता कायम आहेत. त्यामुळेच सदर प्रकल्प अद्यापही अपूर्णच आहे.पिंडकेपार नाल्यावर प्रस्तावित करण्यात आलेल्या या लघू सिंचन प्रकल्पाचे काम रोजगार हमी योजनेंतर्गत सन १९८३-८४ मध्ये सुरू करण्यात आले होते. आर्थिक वर्ष १९८८-८९ मध्ये वन कायद्याच्या अडचणींमुळे हे काम बंद झाले होते. यानंतर वन कायद्याची अडचण सोडविण्यात आली. त्यानंतरही प्रकल्पाच्या समस्या कमी झालेल्या नाहीत. आतापर्यंत सुमारे १२ कोटी रूपये यावर खर्च झाले असूनही मोठ्या प्रमाणात काम बाकीच आहे.प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर त्याच्या क्षेत्रात येणाऱ्या गावांच्या परिसरात मोठे परिवर्तन झाले आहे. या प्रकल्पांतर्गत नागरी भागांमधून कालवा गेल्यामुळे जमिनीचे अभिरेखन करण्यात आले. त्यामुळे कृषी जमीन कमी झाली.ही परिस्थिती पाहून नवीन प्रस्तावाला शासन मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सद्यस्थितीत सुधारित प्रशासकीय मान्यता तयार केली जात आहे. उर्वरित कामांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता तांत्रिक सल्लागार समितीजवळ सादर आहे.प्रकल्पाची सिंचन क्षमता घटलीया प्रकल्पाच्या पाळीची लांबी आता कमी करण्यात आली आहे. सर्वेक्षणाच्या शेवटी डूबित क्षेत्र ३७७.३९ हेक्टरपेक्षा कमी करून २५७.२५ हेक्टरपर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे पाणी संग्रहाची क्षमता ८.५५५ दलघमीऐवजी ७.०६४ दलघमी करण्यात आली आहे. प्रकल्पाचे लाभ क्षेत्र १२६२ हेक्टर एलबीसी पूर्णपणे हटविण्यात आले आहे. ११७० हेक्टर आरबीसी प्रस्तावित करण्यात आली आहे.सहा गावांना सिंचन व पाच गावांना पिण्याचे पाणीया प्रकल्पामुळे गोंदिया तालुक्याच्या कारंजा, फुलचूर, डव्वा, तुमखेडा खुर्द, खमारी व हलबीटोला येथील ११७० हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा होणार आहे. याशिवाय गोंदिया पॅरा अर्बन टप्पा- २ अंतर्गत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली जाईल. त्यासाठी १.७७ दलघमी पाण्याचे आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. जलाशयाला लागून फुलचूर व फुलचूरटोला, नंगपुरा-मुर्री, पिंडकेपारटोला व कारंजा या गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठीसुद्धा काम केले जात आहे.