शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
3
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
4
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
5
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
6
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
7
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
8
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
9
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
10
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
11
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
12
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
13
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
14
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
15
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
16
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
17
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
18
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
19
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
20
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा

३२ हजार शौचालय स्वयंस्फूर्तीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 23:11 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने केलेल्या जनजागृतीमुळे गोंदिया जिल्ह्यातील ३२ हजार २३८ कुटुंबानी २० एप्रिल पर्यंत कवडीची शासकीय मदत न घेता स्वयंस्फूर्तीने शौचालय उभारले आहे.

ठळक मुद्देघर तेथे शौचालय : जिल्ह्यातील गरीब कुटुंबांनी घेतला पुढाकार

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने केलेल्या जनजागृतीमुळे गोंदिया जिल्ह्यातील ३२ हजार २३८ कुटुंबानी २० एप्रिल पर्यंत कवडीची शासकीय मदत न घेता स्वयंस्फूर्तीने शौचालय उभारले आहे. शौचालय बांधण्यासाठी त्यांनी आपल्या मिळकतीतून पैसे वाचवून घरातील कुणीही व्यक्ती उघड्यावर शौचास जाणार नाही असा संकल्प केला.जिल्हा निर्मल करण्याच्या नादात अनेक शौचालय कागदावर दाखविण्यात आले होते. तर काही शौचालयाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. गोंदिया जिल्हा पाच- सात वर्षापूर्वीच ओडीएफ झाला होता.परंतु ६७ हजार ७३८ कुटुंबाकडे शौचालय नव्हते. या कुटुंबामध्ये जिल्हा परिषदेने शौचालयासंदर्भात जनजागृती केली. शासकीय मदत न घेता शौचालय बांधकाम करण्यासाठी ३२ हजार २३८ कुटुंबे पुढे आली आहेत.उर्वरीत असलेल्या १२ हजार १६२ कुटुंबानी शासकीय अनुदानाशिवाय शौचालय तयार करावे यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. यात तिरोडा २९९, सालेकसा ८५९, सडक-अर्जुनी १ हजार ६३८, गोरेगाव ९६४, गोंदिया ३ हजार ६८६, देवरी १ हजार २८०, अर्जुनी-मोरगाव एक हजार ९०६ व आमगाव १ हजार ५३० शौचालयांचा समावेश आहे.मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सिमेला लागून असलेल्या गोंदिया जिल्ह्याची कुटुंबसंख्या सर्वेक्षणानुसार २ लाख १७ हजार १५३ आहे.ज्या कुटुंबाकडे शौचालय नव्हते त्या कुटुंबानी जिल्हा परिषदेने राबविलेल्या ‘घर तेथे शौचालय’ या उपक्रमााचा लाभ घेतला. या अभियानांतर्गत जिल्हा ओडीएफ झाल्यानंतर प्लस होत आहे.जनजागृतीमुळे लोकांचे मनपरिवर्तनजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनात शौचालयाचे महत्व समजाविण्यासाठी व्यापक अभियान चालविण्यात आले. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायतचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावागावात जाऊन जनजागृती केली. घराघरात शौचालय बांधण्यास लोकांना प्रवृत्त केले.तिरोड्यातील ९४.११ टक्के शौचालय मदतीविनाशासकीय अनुदान न घेता जिल्ह्यात ४५ हजार ४०० शौचालय तयार करण्याचे उद्दीष्टे ठेवण्यात आले होते. यात तिरोडा तालुक्याने ५ हजार ७७ शौचालय तयार करण्याचे उद्दीष्टे ठेवले होते. यात ४ हजार ७७४ (९४.११ टक्के) शौचालय तयार करण्यात आले. यानंतर सालेकसात ४ हजार ६७७ पैकी ३ हजार ८१८ ( ८१.६३ टक्के), गोेरेगाव ४ हजार ७७४ पैकी ३ हजार ८१० (७९.८१ टक्के), सडक-अर्जुनी ६ हजार ७४८ पैकी ५ हजार ११० (७५.७३ टक्के), अर्जुनी -मोरगाव ६ हजार ६८१ पैकी ४ हजार ७७५ (७१.४७ टक्के) देवरी ३ हजार ९३० पैकी २ हजार ६५० (६७.४३ टक्के), गोंदिया ९ हजार ६१२ पैकी ५ हजार ९२६ (६१.६५ टक्के) तर आमगाव सर्वात कमी ३ जार ९०१ पैकी २ हजार ३७१ (६०.७८ टक्के) शौचालय तयार करण्यात आले.जिल्हा ओडीएफ नंतर ओडीएफ प्लस करण्याचे प्रयत्न सुरू आहे. शौचालयासाठी घरोघरी जाऊन प्रोत्साहित केले जात आहे. त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळेच शासकीय अनुदानााविनाही लोक स्वयंस्फूतीने शौचालय तयार करीत आहेत.राजेश राठोडउपमुख्य कार्यकारी अधिकारीपाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जि.प.गोंदिया.