शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

३२ हजार नागरिकांनी केले 'महा ई-ग्राम' डाऊनलोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 15:34 IST

Gondia : अॅपवर मिळवा झटपट दाखला ग्रामपंचायतमधील ३३ प्रकारचे दाखले मोबाइलवर

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : तंत्रज्ञान युग आले असल्याने घरबसल्या मोबाइलवर एका क्लिकवर सर्व गोष्टी मिळू लागल्या आहेत. शासनानेही तंत्रज्ञान विकसित करून नागरिकांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्ह्यातील तब्बल ३२ हजार २२८ नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये महा ई- ग्राम सिटिझन कनेक्ट हे अॅप डाउनलोड केले आहे. हे लोक ग्रामपंचायतमधील ३३ प्रकारचे दाखले घरी बसून घेऊ शकतात. 

गावातील ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीशी अधिक संबंध असतो. त्यामुळे त्यांना लागणारे दाखले घेण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये जावे लागते. हव्या असलेल्या दाखल्यासाठी अर्ज करावा लागतो. त्यांनतर ग्रामपंचायत प्रशासन अर्जावर प्रक्रिया करून हवा तो दाखला ग्रामस्थांना देते. मात्र, या प्रक्रियेत वेळ जात असल्याने शासनाच्या ग्रामविकास विभाग आणि पंचायतराज विभागामार्फत महा ई- ग्राम सिटिझन कनेक्ट नावाने अॅप सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या मोबाइलवर ग्रामपंचायतमधील सर्व दाखले घरबसल्या मिळत आहेत. यासाठी आता अॅप डाउनलोड करून घरबसल्या दाखले मिळविले जाणार आहेत. त्यासाठी झटपट हे 'महा ई ग्राम' अॅप डाउनलोड करणे गरजचे आहे. जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतींतर्गत हे महा ई- ग्राम सिटिझन कनेक्ट डाउनलोड झाले आहेत. 

"महा ई-ग्राम सिटिजन अॅप आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करण्यासाठी मोबाइलमधील प्ले स्टोअरमध्ये जाऊन तिथे महा ई-ग्राम सिटिजन कनेक्ट सर्च करायचे आहे. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला सहजरित्या हे अॅप मिळून जाईल किंवा खालील लिंकवरून डाउनलोड करा आणि नागरिकांना घरबसल्या ग्रामपंचायतीच्या सुविधा घ्याव्यात."- गोविंद खामकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग)

कोणते दाखले मिळणार? महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट मोवाइल अॅप हे नागरिक सेवा मिळविण्यासाठी एक खास उपाय आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना जन्म, मृत्यू, विवाह, नमुना ८ (मूल्यांकन), बीपीएल असे प्रमाणपत्र मिळू शकते. नेट बैंकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय आणि क्यूआर स्कॅनिंगचा वापर करून नागरिक आपला मालमत्ता कर ऑनलाइन भरू शकतात. 

महा ई-ग्राम सिटिजन अॅप 

  • जनतेचा त्रास कमी कसा करता येईल यासाठी महाराष्ट्र शासन ऑनलाइन पद्धतीचा वापर करून महा ई-ग्राम सिटिजन कनेक्ट लॉन्च केले आहे. 
  • या अॅपद्वारे आपण घरबसल्या ग्रामपंचायतीचे सर्व दाखले मोबाइ- लद्वारे पाहू शकतो. 
  • याचबरोबर आपल्या ग्रामपंचाय- तीमध्ये असलेली कार्यकारिणी किंवा अधिकारी वर्ग यांची संपूर्ण माहितीसुद्धा या अॅपवर सहजरित्या बघता व त्यात माहिती भरता येणार आहेत. 

अॅप डाउनलोड कसे कराल ? 

  •  गुगल प्ले स्टोअरवर जाऊन महा ई- ग्राम सिटिझन कनेक्ट हे अॅप आपल्या मोबाइलवर डाउनलोड करायचे आहे. त्यानंतर आपला मोबाइल नंबरद्वारे रजिस्टर करायचे आहे. 
  • यामध्ये स्वतःची माहिती भरून अॅप सुरू होते. हे अॅप आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करण्यासाठी मोबाइलमधील प्ले स्टोअरमध्ये जाऊन तिथे महा ई- ग्राम सिटिजन कनेक्ट सर्च करायचे आहे. 
  • हे सर्व केल्यानंतर तुम्हाला सहजरित्या हे अॅप मिळून जाईल किंवा खालील लिंकवरून डाउनलोड करा आणि नागरिकांना घरबसल्या ग्रामपंचायतीच्या सुविधा घ्याव्यात.
टॅग्स :gondiya-acगोंदिया