लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी उपयोगी ठरत आहे. यामुळेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा डोनेशनसाठी पुढे येण्याची साद शासन आणि आरोग्य विभागाने घातली आहे. यालाच प्रतिसाद देत कोरोनामुक्त झालेल्या ३१ जणांनी प्लाझ्मा डोनेशनसाठी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी गौरवाची बाब आहे.मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत सुध्दा भर पडत आहे.कोरोनावर अद्याप लस उपलब्ध झाली नसली तरी प्लाझ्मा थेरपी बऱ्याच प्रमाणात उपयोगी पडत आहे. परिणामी याचा अनेक ठिकाणी प्लाझ्मा डोनरच्या मदतीने उपयोग केला जात आहे. यामुळे कोरोना बाधित रुग्ण बरे होण्यास त्याची मदत होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २३१ कोरोना बाधित रुग्ण आढळले. यापैकी १९८ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहे. यापैकीच बऱ्या झालेल्या ३१ जणांनी प्लाझ्मा डोनेशची तयारी आरोग्य विभागाकडे दर्शविली आहे. ही निश्चित दिलासादायक बाब आहे.जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रविवारी (दि.१९) पुन्हा तीन कोरोना बाधितांची भर पडली. यात तिरोडा तालुक्यातील १ आणि गोंदिया तालुक्यातील २ जणांचा समावेश आहे. हे तिन्ही जण बाहेरुन आलेले आहे. त्यांना गोंदिया येथे क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले होते. रविवारी त्यांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.तर पाच कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २३१ कोरोना बाधितांची नोंद झाली असून यापैकी १९८ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात २८ कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.६८०३ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ७१४३ जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी २३१ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ६८०३ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. २५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.८७ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाबाबत अनिश्चितता आहे. रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून आतापर्यंत ६८३ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ६८० नमुने निगेटिव्ह तर तीन नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.
प्लाझ्मा डोनेशनसाठी ३१ जणांची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST
मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत सुध्दा भर पडत आहे. कोरोनावर अद्याप लस उपलब्ध झाली नसली तरी प्लाझ्मा थेरपी बऱ्याच प्रमाणात उपयोगी पडत आहे. परिणामी याचा अनेक ठिकाणी प्लाझ्मा डोनरच्या मदतीने उपयोग केला जात आहे. यामुळे कोरोना बाधित रुग्ण बरे होण्यास त्याची मदत होत आहे.
प्लाझ्मा डोनेशनसाठी ३१ जणांची तयारी
ठळक मुद्देतीन कोरोना बाधितांची भर : पाच कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २३१ वर