लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मध्यम, लघु व जूने मोठ्या मालगुजारी तलावांची संख्या ६९ आहेत. यापैकी ४२ तलाव यंदा ओव्हरफ्लो झाले आहेत.यामुळे शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या बऱ्याच प्रमाणात मार्गी लागली आहे.जे तलाव ओव्हरफ्लो झाले त्यात मध्यम प्रकल्पाचे बोदलकसा, रेंगेपार, संग्रामपूर, कटंगी यांचा समावेश आहे. मध्यम प्रकल्पाचे एकूण ९ तलाव आहेत. यातील चार तलाव ओव्हरफ्लो झाले. लघु प्रकल्पाचे २२ तलाव आहेत. यात डोंगरगाव, मोगरा, नवेगावबांध, पांगडी, राजोली, सोनेगाव, जुनेवानी व बेवारटोलाचा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. जूने मालगुजारी तलावात भानपूर, भिवखिडकी, चान्ना बाक्टी, धाबेटेकडी, फूलचूर, गोठनगाव, गिरोला, गंगेझरी, कवठा, कोहलगाव, खैरी, कोसबीबाकी, खमारी, काटी, कोकणा, खोडशिवनी, माहुली, मालीजुंगा, मुंडीपार, मेंढा, मोरगाव, माहुरकुडा, निमगाव, नांदलपार, पळसगाव (सौंदड), पालडोंगरी, पळसगाव (डव्वा), सौंदड, तेढा, ताडगाव यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व जलाशय व तलावांची जलसिंचन क्षमता २०५.४९३ दलघमी आहे. सद्यस्थितीत या तलावात ८८.१० टक्के पाणीसाठा आहे. एकूण १८१.०३८ दलघमी पाणीसाठा आहे. ही स्थिती बरी असल्याचे सांगितले जाते. हे तलाव सिंचनासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.काही तलाव तहानलेलेदेवरी तालुक्यात मध्यम प्रकल्पाचा सालेगाव तलावात आतापर्यंत पाहिजे तेवढा पाणीसाठा जमा झाला नाही. या तलावात ३३.५३ टक्के पाणी जमा झाले. देवरी तालुक्याच्या रहेडी येथील तलाव ५६.५१, गोरेगाव तालुक्याच्या कालीमाटी येथील तलाव ५०.९१ टक्के, जुन्या मालगुजारी तलावात चिरचाळबांध ४३.६४ टक्के पाणीसाठा आहे. तसेच स्थानिक स्तरचे तीन मुख्य तलावापैकी देवरी तालुक्याच्या सालेगाव तलावात २१.५९ व चारभाटा तलावात २३.८९ टक्के पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील ४२ मुख्य तलाव ‘ओव्हरफ्लो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST