शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

धान नासाडीची २९४ प्रकरणे मंजूर

By admin | Updated: March 28, 2016 01:53 IST

तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत चार क्षेत्र (राऊंड) आहेत. सर्व परिक्षेत्रातून यावर्षी साडे सहाशे धान

काचेवानी : तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत चार क्षेत्र (राऊंड) आहेत. सर्व परिक्षेत्रातून यावर्षी साडे सहाशे धान नुकसानीची प्रकरणे पाठविण्यात आली. यापैकी ६० टक्के म्हणजे २९४ प्रकरणे मंजूर करण्यात आली असून धनादेश वाटप करण्यात आले आहेत. तिरोडा, इंदोरा, वडेगाव व गोविंदटोला हे चार क्षेत्र आहेत. यापैकी सर्वाधिक नासाडी तिरोडा, वडेगाव व इंदोरा या क्षेत्रांत होत आहे. तिरोडा क्षेत्रात सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात रानडुकरांच्या धान नासाडीची सर्वाधिक २५३ प्रकरणे असून, एकूण ६४२ प्रकरणे मंजुरीसाठी गोंदिया उपवन विभागाकडे पाठविण्यात आले होते. यापैकी आतापर्यंत २९४ प्रकरणे मंजूर करण्यात आले.शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असले तरी शासनाच्या निर्देशानुसार वनविभागाद्वारे नुकसान भरपाईची प्रकरणे तत्काळ तयार करून मंजुरीसाठी जिल्हास्तरावर पाठविले जात आहेत. शेतकऱ्यांना वनविभागाचे सहकार्य असून प्रकरणे निकाली काढण्यात येत असल्याचे तिरोडा राऊंड आॅफिसर व्ही.सी. मेश्राम यांनी सांगितले.वनविभागाने यावर्षी नुकसान भरपाई देण्यात घाई केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी वनविभागाचे आभार व्यक्त केले. मात्र नुकसान भरपाईचे प्रमाण खूपच कमी असल्याची ओरड केली जात आहे. वन्य प्राण्यांद्वारे झालेली नासाडी मोठ्या प्रमाणात असून नुकसानीच्या ४० टक्केच शेतकरी भरपाई मिळण्यासाठी दावे प्रकरण दाखल करतात. दावे प्रकरण दाखल करण्यासाठी विविध भानगडी असल्याने अनेक शेतकरी प्रकरण दाखलच करीत नाहीत.दहा वर्षांपूर्वी रानडुकरे व इतर वन्यप्राण्यांची ये-जा गावांकडे नव्हती. तेव्हा अचानक भटकल्याने दिसत होते. मात्र सध्या वन्यप्राणी गावालगत येण्याचे प्रमाण वाढले आहे. घराशेजारी असलेली कंदमुळे, भाजीपाला, धानपिकांची नासाडी वाढतच आहे. ते दिवसा जवळच्या झाडझुडुपात किंवा नाल्याच्या काठावर किंवा ओलसर भागात वास्तव्य करतात. त्यामुळे त्यांना मारणे किंवा पिकांचे संरक्षण करणे कठिण झाले आहे. हे प्राणी दिवसा कमी प्रमाणात वावरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कमी आहे. तरी शिवारात एकटी महिला किंवा पुरूष जायला घाबरत आहे.डुकरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एक मादी डुक्कर सात ते १२ पिल्लांना जन्म देते. त्यांना मारण्याची किंवा मरणाची संख्या कमी असल्याने त्यांच्या वाढीचे प्रमाण वाढले आहे. वनविभागाने याकडे लक्ष दिले नाही तर माणसाला घराबाहेर वावरणे कठिण होईल. रानडुकरे शक्तिशाली असल्याने कोणताही माणूस सहजासहजी त्यांना मारू शकत नाही, असे वास्तव आहे. (वार्ताहर)शासनाचे परिपत्रक काय सांगते?राज्य वन्यजीव मंडळाच्या नवव्या बैठकीत रोही व रानडुक्कर यांचा पारध करण्याच्या सुलभीकरणासाठी सुधारित सूचना जारी करण्यात आली. यात त्यांच्यापासून नुकसान होत असल्यास तशी तक्रार वनविभागाला देण्यात यावी व पोचपावती घ्यावी. वनक्षेत्रपालकांनी शहानिशा केल्यानंतर २४ तासांच्या आत मारण्याची परवानगी द्यावी. परवानगी न मिळाल्यास परवाना आहे, असे गृहीत धरावे. राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, संवर्धन राखीव क्षेत्रात कसल्याही प्रकारची परवानगी देता येणार नाही. त्यांच्या पाच किमी सभोवतालच्या क्षेत्रात पारध करताना अत्यधिक काळजी घ्यावी. दर महिन्याला आलेले परवाने व पारध झालेले रानडुक्कर किंवा रोही यांची संख्या व विल्हेवाटाचा माहिती अहवाल उपवनसंरक्षक यांच्याकडे द्यावे. या परिपत्रकात मारण्याची पद्धत दिली आहे. मात्र मृत जनावराची विल्हेवाट कशी लावावी याबाबत स्पष्ट सूचना नसल्याने वनविभाग व पारध करणारे यांच्यात संभ्रम आहे.मृत जनावराचा जागेवरच लिलावपारध केल्यानंतर मृत जनावर वनविभागाच्या स्वाधीन केले जाते. रानडुक्कर किंवा रोही याला जाळण्याकरिता दीड ते दोन टन लाकडे लागतात. या भानगडीमुळे कुणीही मारण्याकरिता तयार होत नाही. शासनाने यावर विचार करण्याची गरज आहे. रानडुक्कर किंवा रोही मारल्यानंतर त्याची सूचना वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाने त्या मृत जनावराचा लिलाव करून विक्री करण्याची मूभा द्यावी. असे केल्यास वनविभागाची डोकेदुखी कमी होईल व कुणीही मारण्यास घाबरणार नाही. गरजूंना त्याचे मांस किंवा इतर कामासाठी उपयोगात आणता येईल. जाळण्यासाठी वनविभागाला लाकडे लागतात. त्यामुळे हजारो रूपयांची बचत होईल. उलट मांस विक्रीची रक्कम वनविभागाच्या तिजोरीत जमा होईल. त्यामुळे मृत जनावराची विक्री जागेवर लिलावाद्वारे करावी, अशी मागणी आहे.