शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

२५ टक्के राखीव प्रवेशाचे ४ कोटी १६ लाख अडले

By admin | Updated: July 13, 2016 02:21 IST

शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ चे कलम १२ नुसार वंचित आणि दुर्बल घटकातील बालकांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळा,

१२२ शाळांचा समावेश : प्रवेश नाकारण्यासाठी शाळा झाल्या हतबल नरेश रहिले गोंदिया शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ चे कलम १२ नुसार वंचित आणि दुर्बल घटकातील बालकांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळा, कायम आणि विनाअनुदानित शाळांत २५ टक्के जागा राखीव ठेवून प्रवेश देण्याची अट शासनाने घातली आहे. त्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील १२२ शाळांमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. मात्र मागील चार वर्षात त्या राखीव जागांवरील विद्यार्थ्यांपोटी शाळांना मिळणारे ४ कोटी १६ लाख ४४ हजार रुपये शासनाकडून मिळालेच नाही. त्यामुळे संबंधित शाळांचे संचालक अडचणीत आले आहेत. वंचित आणि दुर्बल घटकातील बालकांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांत प्रवेश घेण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली जाते. त्या विद्यार्थ्यांची खासगी शाळांत लागणारे शुल्क शासन त्या संस्थांना शासनाकडून देण्यात देते. मागील चार वर्षात गोंदिया जिल्ह्यात वंचित आणि दुर्बल घटकातील बालकांना शिक्षण देणाऱ्या शाळांना विद्यार्थ्यांच्या शुल्कापोटी ५ कोटी ७१ लाख ५७ हजार ३७२ रूपये शासनातर्फे मिळणे अपेक्षित होते. मात्र फक्त एक कोटी ५५ लाख १२ हजार ३९७ रूपये देण्यात आले आहेत. उर्वरित ४ कोटी १६ लाख ४४ हजार ९७५ रूपये या शाळांना देणे बाकी आहे. शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार सन २०१२-१३ पासून वंचित आणि दुर्बल घटकातील बालकांना इंग्रजी माध्यमांध्ये प्रवेश देणे अनिवार्य करण्यात आले. त्यानुसार सन २०१२-१३ या वर्षात पहिल्या वर्गात ५१६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. सन २०१३-१४ या वर्षात पहिल्या वर्गात ८३६, दुसऱ्या वर्गात ५१६ असे १३५२ विद्यार्थी होते. या दोन वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कापोटी एक कोटी ४९ लाख ६९ हजार ८९१ रूपये मागणी करण्यात आली होती. परंतु २०१३-१४ या वर्षात ७२ लाख ८ हजार ३९७ रूपये शासनाने दिले. ते पैसे गोंदियातील ५५ शाळांना वाटप करण्यात आले. मात्र गेल्या दोन वर्षातील ७७ लाख ६१ हजार ४९४ रूपये देण्यात आले नाही. सन २०१४-१५ या वर्षात पहिल्या वर्गात ६२३, दुसऱ्या वर्गात ८३६, तिसऱ्या वर्गात ५१६ अश्या १९७५ विद्यार्थ्यांचा प्रवेश होता. त्यांच्या शाळांना एक कोटी ७२ लाख ८ हजार ९५ रूपये शासनाकडून घेणे होते. परंतु शासनाने एकदा आठ लाख व दुसऱ्या वेळी ७५ लाख ४ हजार रूपये पाठविले. त्या शाळाचे ८९ लाख ४ हजार ९५ रूपये अडवून ठेवले आहेत. सन २०१५-१६ या वर्षात पहिल्या वर्गात ७४३, दुसऱ्या वर्गात ६२३, तिसऱ्या वर्गात ८३६, चवथ्या वर्गात ५१६ असे २७१८ विद्यार्थ्यांपोटी २ कोेटी ४९ लाख ७९ हजार ३८६ रूपयांची मागणी करण्यात आली. परंतु त्यातील एकही पैसे देण्यात आले नाही. मागील चार वर्षातील चार कोटी १६ लाख ४४ हजार ९७५ रूपये शाळांना न मिळाल्यामुळे शाळा संचालक मोठ्या अडचणीत आले आहेत. शाळांना कारवाईची भीती जिल्ह्यात वंचित आणि दुर्बल घटकातील बालकांना कायम व विनाअनुदानित नामांकित इंग्रजी माध्यमांच्या १२२ शाळांमध्ये मागील चार वर्षापासून ही प्रवेश प्रक्रिया करण्यात येते. परंतु शासनाने मोठ्या प्रमाणात रक्कम न दिल्याने त्या बालकांना आता प्रवेश द्यायचा किंवा नाही असा पेच शाळा संचालकांपुढे निर्माण झाला. परंतु शासनाचे पैसे आहेत जाणार कुठे असा विचार काही आर्थिकदृष्ट्या सक्षम शाळांचे संचालक करीत आहेत. मात्र यामुळे सर्वसाधारण शाळांना आपला खर्चही भागविणे कठीण होत आहे. जर त्या मुलांना प्रवेश देण्यास नकार दिला तर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्याचे पत्र शिक्षण संचालकांना पाठविले जाते. याची धास्ती शाळा चालविणाऱ्या शिक्षण संस्था चालकांमध्ये असते. तीन कि.मी.च्या अटीमुळे संधी हुकली जिल्ह्यात ग्रामीण भागात व नक्षलग्रस्त भागात दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थी बरेच आहेत. परंतू त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांमध्ये प्रवेश हवा असेल तर त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही. कारण जिल्ह्यात इंग्रजी माध्यमांच्या बहुतांश शाळा शहरी भागात आहेत. नियमानुसार संबंधित विद्यार्थ्याच्या घरापासून त्या शाळेचे अंतर तीन किलोमीटरपेक्षा अधिक असू नये. त्यामुळे सालेकसा, देवरी, आमगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गोंदियातील नामांकित शाळांमधील प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे.