शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

२५ नवीन विंधन विहिरींना मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 21:22 IST

टंचाई निवारणार्थ जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अधिकाराचा वापर करु न आमगाव तालुक्यातील १५ गावे-वाड्या, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील चार गावे-वाड्या व देवरी तालुक्यातील सहा गावे-वाड्यांमध्ये एकूण २५ नवीन विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाई उपाययोजना : २७.२० लाखांचा खर्च करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : टंचाई निवारणार्थ जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अधिकाराचा वापर करु न आमगाव तालुक्यातील १५ गावे-वाड्या, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील चार गावे-वाड्या व देवरी तालुक्यातील सहा गावे-वाड्यांमध्ये एकूण २५ नवीन विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.यांतर्गत, आमगाव तालुक्यातील ग्राम टेकरी येथे चुन्नीलाल टेकाम यांच्या घराजवळ, ग्राम बुराडीटोला येथे ब्रिजलाल कटरे यांच्या घराजवळ, ग्राम डोंगरगाव येथे ईश्वर चौरे यांच्या घराजवळ, ग्राम जवरी (शिवनटोला) रु द्रसेन बंसोड यांच्या घराजवळ, ग्राम शिवणी येथे भाऊदास भिवगडे यांच्या घराजवळ, ग्राम खुर्शीपारटोला येथे कुवरलाल उईके व रमेश इनवाते यांच्या घराजवळ, ग्राम ठाणा येथे प्रदीप माटी यांच्या घराजवळ, ग्राम आसोली येथे जिल्हा परिषद शाळेजवळ, ग्राम जांभुळटोला जिरन मेश्राम यांच्या घराजवळ, ग्राम तिगाव येथे श्यामशंकर बोपचे यांच्या घराजवळ, ग्राम बघेडा येथे भारत ठाकरे यांच्या घराजवळ, ग्राम वडद येथे पुरणलाल पटले यांच्या घराजवळ, ग्राम सोनेखारी येथे विनोद पटले यांच्या घराजवळ, ग्राम पाऊलदौना येथे हरिचंद अडमे यांच्या घराजवळ नवीन विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील मोरगाव-अर्जुनी येथे गोरख लाडे यांच्या घराजवळ, ग्राम सावरी येथे जगन राऊत यांच्या घराजवळ, ग्राम खामखुर्रा येथे अनंतकुमार राऊत यांच्या घराजवळ, ग्राम झाशीनगर येथे दिलीप कोरेटी यांच्याघराजवळ तर देवरी तालुक्यातील पिपरखारी (इंदिरानगर) येथे मैथली मडावी यांच्या घराजवळ, ग्राम आमगाव येथे शालिकराम भोयर यांच्या घराजवळ, ग्राम मांगोटोला येथे उमरोनी नेताम यांच्या घराजवळ, ग्राम महाका (उचेपुर) येथेबघुतराम मुलेटी यांच्या घराजवळ, ग्राम जेठभावडा येथे प्रिया राऊत यांच्या घराजवळ तर ग्राम बोरगाव (शिलापूर) येथे नळ योजना विहिरीजवळ नवीन विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहेत. यासाठी २७ लाख २० हजार ३०० रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई