गोंदिया : जिल्ह्यात मागील वर्षी २७ मार्चला कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर जवळपास जिल्ह्यात कोरोनाबाधितांची नोंद झाली नव्हती. मात्र, मे महिन्यापासून पुन्हा बाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आणि हळूहळू पाहता पाहता ही संख्या एक वरून २९६३३ वर पोहोचली. बाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढत गेली. आतापर्यंत तब्बल २३ हजार बाधितांनी कोरोनाला हरविले असून, ते एकदम तंदुरुस्त आहेत. कोरोना झाल्यावर एकदम घाबरून न जाता वेळीच चाचणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केल्यास कोरोनावर सहज मात करता येते. त्यामुळे कोरोना झाला म्हणजे आपल्याला महाभयंकर आजार झाला, आता त्यातून आपली सुटका होणे शक्य नाही असा समज बाळगण्याची चुकीचे आहे. जिल्ह्यात २९६६६ बाधितांची नोंद झाली असली तरी २३ हजार बाधितांनी त्यावर मात केली आहे. काेराेनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेट देखील कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
.............
काेट
आमचे शेजारी कोरोनाबाधित आले. मी देखील त्यांच्या संपर्कात आल्याने कोरोना चाचणी करून घेतली. माझी सुद्धा टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे वेळीच डॉक़्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेतला. १४ दिवस गृहविलगीकरणात होतो. त्यानंतर परत १४ दिवसांनी कोरोनाची चाचणी केली ती निगेटिव्ह आली. अशाप्रकारे मी कोरोनावर मात केली.
- रामप्रसाद गुरुनुले,
........
कोरोना हा सुद्धा इतर संसर्गजन्य आजारासारखाच एक आजार आहे. त्यामुळे तो झाल्यावर एकदम घाबरून न जाता वेळीच डॉक़्टरांचा सल्ला घेऊन उपचार केल्यास आजारातून लवकरच बाहेर पडता येते. मी सुद्धा या आजारातून औषधोपचाराने बरा झालो.
- गुरुदास वसाके
....................
कोरोना संसर्गाची लक्षणे दिसता वेळीच डॉक्टराकडे जा, सर्वांत आधी चाचणी करून घ्या, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्या आणि गृहविलगीकरणाचे नियम पाळा, औषधोचाराने तुम्ही निश्चित कोरोनाला हरवाल मी सुद्धा हेच करून कोरोनाला हरविले.
- सचिन उमक,
.................
कोट :
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर घाबरून न जात यावर मात करण्याचा सकारात्मक विचार बाळगण्याची गरज आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे नियमित सेवन करावे, नियमित योगासन व व्यायाम करावा, सकारात्मक विचाराचे पुस्तकांचे वाचन करावे, आपल्या आजूबाजूचा परिसर प्रसन्न राहील असे वातावरण ठेवावे. आपल्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आपण कोरोनावर सहज मात करू शकतो.
- डॉ. लाेकेश चिरवतकर, मानसोपचार तज्ज्ञ
.........
जिल्ह्याची लोकसंख्या : १३ लाख ५०७६५
...........
सात दिवसांतील कोरोनामुक्तीचा आढावा
सोमवार : ६६३
मंगळवार : ६१२
बुधवार : ७४५
गुरुवार : ५८१
शुक्रवार : ७४२
शनिवार : ६६३
.........................
कोरोनाचा संशय आल्याने स्वॅब तपासणाऱ्यांची संख्या : १२९५४३
कोरोना निगेटिव्ह आलेल्यांची संख्या : १०५६८७
वर्षभरातील कोरोना बाधितांची संख्या : २९६६३
कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या : २२६४२
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : ६५३७
....................