शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

२.२७ लाख विद्यार्थ्यांनी ऐकले मोदींचे भाषण

By admin | Updated: September 6, 2014 02:01 IST

विद्यार्थ्यांशी टिव्ही, इंटरनेट यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष संवाद साधून शिक्षक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण विद्यार्थ्यांनी ऐकावे यासाठी ...

गोंदिया : विद्यार्थ्यांशी टिव्ही, इंटरनेट यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष संवाद साधून शिक्षक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण विद्यार्थ्यांनी ऐकावे यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने २७ आॅगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाला पत्र पाठविले. तर दुसऱ्याच दिवशी प्राथमिक शिक्षक संचालनालय पुणे यांनी २८ आॅगस्ट रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पंतप्रधानांचे भाषण ऐकविण्याची व्यवस्था करावी, असे पत्र पाठविले. त्यामुळे जिल्ह्यातील १६४० पैकी १६०७ शाळांमध्ये पंतप्रधानांचे भाषण टिव्ही, रेडिओ, इंटरनेटच्या माध्यमातून दाखविण्यात आले. यात दोन लाख २६ हजार ९५८ विद्यार्थी तर आठ हजार ८७५ शिक्षकांनी पंतप्रधानांचे भाषण ऐकले. गोंदिया तालुक्यातील ३९० शाळांमधील ७८ हजार ५५९ विद्यार्थी व तीन हजार २७ शिक्षकांनी पंतप्रधानांचे भाषण ऐकले. यात २०५ शाळांमध्ये टिव्हीवर तर १८५ शाळांमध्ये रेडीओवर भाषण ऐकण्यात आले. तिरोडा तालुक्यातील २०२ शाळांमधील २८ हजार ७८५ विद्यार्थी व एक हजार २९९ शिक्षकांनी पंतप्रधानांचे भाषण ऐकले. या तालुक्यात सर्वशाळांमध्ये टिव्ही संच बसविण्यात आले होते. गोरेगाव तालुक्यातील १५५ शाळांपैकी १५३ शाळांमध्ये भाषण ऐकविण्यात आले. यात २१ हजार ४६१ विद्यार्थी, ६५० शिक्षकांनी भाषण ऐकले. येथे १४४ टिव्ही तर नऊ रेडीओ वापरण्यात आले. दोन शाळांमध्ये भाषण ऐकले गेले नाही. आमगाव तालुक्यातील १५१ शाळांमधील २० हजार ५७१ विद्यार्थी व ७९० शिक्षकांनी टिव्हीवर भाषण ऐकले. सालेकसा तालुक्यातील १५२ पैकी १४० शाळांमध्ये भाषण ऐकविण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यात १० हजार १२५ विद्यार्थी तर ५३० शिक्षकांनी सहभाग घेतला होता. ६२ शाळांमध्ये टिव्ही तर ७८ शाळांमध्ये रेडीओची व्यवस्था करण्यात आली होती. नक्षलग्रस्त भागातील १२ शाळांमध्ये पंतप्रधानांचे भाषण ऐकले गेले नाही. देवरी तालुक्यातील २०४ शाळांपैकी २०२ शाळांमध्ये भाषण ऐकविण्यात आले. यात २१ हजार ३४८ विद्यार्थी, ९६९ शिक्षकांनी भाषण ऐकले. या तालुक्यातील दोन नक्षलग्रस्त गावातील शाळांमध्ये भाषण ऐकण्यात आले नाही. २०२ शाळांमध्ये टिव्ही संच बसविण्यात आले होते. सडक/अर्जुनी तालुक्यातील १७२ पैकी १६० शाळांमध्ये भाषण ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यात १८ हजार ४२५ विद्यार्थी, ६५० शिक्षकांनी भाषण ऐकले. या तालुक्यातील नक्षलग्रस्त असलेल्या १२ शाळांमध्ये भाषण ऐकण्यात आले नाही. १६० शाळांमध्ये टिव्ही संच बसविण्यात आले होते. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील २१४ शाळांपैकी २०९ शाळांमध्ये भाषण ऐकण्याची सोय करण्यात आली होती. त्यात २७ हजार ६८४ विद्यार्थी, ९६० शिक्षक सहभागी झाले होते. १९४ शाळांमध्ये टिव्हीची सोय तर १५ शाळांमध्ये रेडीओची सोय करण्यात आली होती. पाच शाळांमध्ये पंतप्रधानांचे भाषण ऐकले गेले नाही. जिल्ह्यातील १६४० शाळांपैकी १६०७ शाळांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकविण्यात आले. यात दोन लाख २६ हजार ९५८ विद्यार्थ्यांनी तर आठ हजार ८७५ शिक्षकांनी सहभाग घेतला. यापैकी एक हजार ३२० शाळांमध्ये टिव्ही तर २२० शाळांमध्ये रेडीओचा वापर करण्यात आला होता. विशेष म्ह़णजे फक्त ३३ शाळांनी पंतप्रधानांचे भाषण विद्यार्थ्यांना एकता यावी याची सोय केली नसल्याचे कळले. जिल्ह्यातील दोन लाख ६१ हजार १०६ विद्यार्थ्यांपैकी दोन लाख २६ हजार ९५८ विद्यार्थ्यांनी विविध माध्यमांतून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले. तर ३४ हजार १४८ विद्यार्थी पंतप्रधानांच्या भाषणाला गैरहजर होते. जिल्ह्यातील शाळांमध्ये टिव्ही आणि रेडीओ कुणी भाड्याने घेतले, कुणी पाटलाघरुन आणले, एखाद्या शिक्षकाने स्वत:च्या घरचा टिव्ही उचलून नेला तर कुठे सरपंचाला विनंती करून टिव्हीची सोय करण्यात आल्याचे दिसून आले. (तालुका प्रतिनिधी )