शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

२२५४ खातेदार बनले सभासद

By admin | Updated: January 13, 2017 01:01 IST

फक्त खातेदार म्हणून संस्थेत असल्याने मिळणाऱ्या सुविधांपासून शेतकरी वंचीत राहतात.

सहकार विभागाचा अभियान : कित्येक खातेदारांची अनिच्छागोंदिया : फक्त खातेदार म्हणून संस्थेत असल्याने मिळणाऱ्या सुविधांपासून शेतकरी वंचीत राहतात. मात्र सभासदांप्रमाणेच या खातेदारांना अन्य सुविधा मिळाव्या या उद्देशातून सेवा सहकारी संस्थेत असलेल्या खातेदारांना आता सभासद करण्यासाठी सहकार विभागाकडून अभियान राबविले जात आहे. यांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २२५४ खातेदारांना संस्था सभासद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात मात्र खातेदारांची अनिच्छा दिसत आहे. गाव पातळीवर कार्यरत असलेल्या सेवा सहकारी संस्थेतून शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातात. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे ‘कर्ज’ ही असते. यासाठी संबंधीत शेतकरी संस्थेचा सभासद असणे गरजेचे आहे. मात्र माहिती अभावी गावातील शेतकरी सेवा सहकारी संस्थेचे खातेदार तर असतात मात्र ते सभासद नसल्याने कर्जासह अन्य सुविधांपासून वंचीत राहतात. शेतीचा हंगाम येताच या शेतकऱ्यांना कर्जासाठी इतरत्र भटकावे लागते. माहितीचा अभाव असल्याने आपल्या हक्काच्या संस्थेतून मिळणाऱ्या सोयींना ते मुकतात. हा प्रकार संपुष्टात यावा व प्रत्येक शेतकऱ्याला सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून मिळणाऱ्या सोयी प्राप्त व्हाव्या या उद्देशातून सहकार मंत्र्यांनी सेवा सहकारी संस्थेतील खातेदारांना सभासदत्व देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सहकार विभागाकडून विशेष अभियान राबवून सेवा सहकारी संस्थेतील खातेदारांना सभासद करवून देण्याचे कार्य केले जात आहे. साधारण खातेदार असलेले हे शेतकरी संस्थेचे सभासद झाल्यास त्यांना संस्थेकडून हंगामात कर्ज तर मिळणारच. शिवाय संस्थेकडून पुरविण्यात येणाऱ्या अन्य सुविधांसाठीही ते पात्र ठरणार आहेत. त्यानुसार सहकार विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या अभियानांतर्गत २२५४ खातेदारांना संस्थांचे सभासद बनविण्यात आले आहेत. असे असतानाही मात्र आताही ६२ हजार ७२८ खातेदार सभासद बनवयाचे आहेत. मात्र यातही कित्येक सभासदांची अनिच्छा असल्याने या मोहिमेला पाहिजे तसे यश मिळाले नाही. परिणामी खातेदारांना सभासद बनविण्यात आल्याचा आकडा कमी दिसतो. (शहर प्रतिनिधी) माहिती अभावी शेतक री पिछाडले शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामात पैसा लागतो. अशात सेवा सहकारी संस्थेच्या माध्यामातून कर्ज वाटप होत असले तर हे खातेदार शेतकरी कर्ज वाटपात पात्र ठरत नसून मुकतात. परिणामी इतरत्र उधार-उसनवारी किंवा सावकाराकडून व्याजावर पैसा घेणे हेच पर्याय उरतात. त्याचे परिणामही पुढे जावून शेतकऱ्यांना भोगावे लागतात. हे प्रकार थांबावे व पात्र प्रत्येक शेतकऱ्याला संस्थेकडून सहकार्य लाभावे या व्यापक दृष्टीकोनातून सहकार मंत्र्यांनी खातेदारांना सभासदत्व देण्याचा हा निर्णय घेतला आहे.