शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

२९१ गावांना दारुबंदीचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 22:46 IST

दुर्धर आजारामुळे एकाच व्यक्तिचा मृत्यू होतो. परंतु दारुमुळे दारु पिणाऱ्याचे अख्खे कुटूंब मरते. यासाठी दारु विरोधात एल्गार पुकारण्यात महिला मंडळी अग्रेसर असतात. गावागावांत दारुबंदी विरोधात महिलांनी मोहीम छेडली आहे. ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव टाकून दारुबंदी न केल्यास तुम्हाला निवडणुकीत सहकार्य करणार नाही, अशा धमक्या ही महिला मंडळी गावातील पुढाऱ्यांना देतात.

ठळक मुद्देतंटामुक्त मोहिमेला महिलांचा पाठिंबा : महिलांच्या पुढाकारामुळे दारुमुक्त होऊ पाहतो गोंदिया जिल्हा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गडचिरोली व चंद्रपूर यानंतर गोंदिया जिल्हा शंभर टक्के दारुबंदी होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांच्या घेतलेल्या आढाव्यानुसार एक हजार १०१ गावांपैकी ८१० गावांमध्ये दारुबंदी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. उर्वरित २९१ गावात आता दारूबंदी करण्यासाठी जिल्ह्यातील तंटामुक्त समित्या व महिला मंडळी किती सजग आहेत याची प्रचिती येते.दुर्धर आजारामुळे एकाच व्यक्तिचा मृत्यू होतो. परंतु दारुमुळे दारु पिणाऱ्याचे अख्खे कुटूंब मरते. यासाठी दारु विरोधात एल्गार पुकारण्यात महिला मंडळी अग्रेसर असतात. गावागावांत दारुबंदी विरोधात महिलांनी मोहीम छेडली आहे. ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव टाकून दारुबंदी न केल्यास तुम्हाला निवडणुकीत सहकार्य करणार नाही, अशा धमक्या ही महिला मंडळी गावातील पुढाऱ्यांना देतात. परिणामी आपली मते खराब होणार नाही याची काळजी घेत दोन-चार दारु विक्रेत्यांच्या विरोधात समिकरण तयार करुन गावात दारुबंदीसाठी ठराव घेण्याचा प्रयत्न करतात.गोंदिया जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या छोट्या-मोठ्या एक हजार १०१ गावांपैकी ८१० गावांमध्ये दारुबंदी तंटामुक्त समिती महिला मंडळींनी गठित केल्याची बाब पुढे आली आहे.महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या शासन निर्णयात गावातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धंदे बंद पाडून त्यांना सन्मानाच्या रोजगाराकडे वळविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचा आधार घेत तंटामुक्त समित्या व महिला मंडळींनी गावातील अवैध धंदे म्हणजे दारुला मुख्य समजून या दारुला आपल्या गावातून हद्दपार करण्याचा मानस बांधला. त्यामुळे जिल्ह्यातील ८१० गावांमध्ये दारुबंदी झाली आहे.रु विकणाऱ्यांचे धंदे बंद करुन त्यांना गावात सुरु होणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या कामावर प्राधान्य देण्यात आले आहे.आर्थिक बचत; कलह कमीदारूमुळे पैशांची नासाडी होऊन गृहकलह वाढते. यामुळे महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतल्याने ८१० गावातील दारूबंद करण्यात आली. त्यामुळे या गावातील दारू पिणाऱ्या व्यक्तींच्या पैशांची बचत झाली. दारूबंदी झाल्याने वादही कमी झाले. दारूबंदीमुळे गावातील वातावरण आता सुधारत आहे. मद्यप्राशन करून गावातील चौकाचौकात धिंगाणा घालणाऱ्यांनी मंदिराची वाट धरली आहे.२९१ गावांकडे लक्षजिल्हा दारूबंदी करण्यासाठी फक्त २९१ गावे उरली आहे. महिलांनी या गावांमध्ये कंबर कसून दारूबंदी करण्यास सुरूवात केल्यास जिल्ह्यात दारूबंदी करण्यास वेळ लागणार नाही. राज्यातील दारूबंदी होणारा तिसरा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याचे नाव पुढे येईल. ही गावे दारूबंदी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने पुढाकार घेऊन महिलांची मदत करणे आवश्यक आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी