शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्थानकावरील चोरीच्या १९ मोटारसायकल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:25 IST

रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी संयुक्त कारवाई करून एका मोटारसायकल चोराला पकडले. त्याच्यांजवळून चोरीच्या १९ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. या सर्व मोटारसायकल नागपूर, दुर्ग व गोंदिया रेल्वे स्थानकावरून पळविल्याचे पुढे आले आहे.

ठळक मुद्देनागपूर, दुर्ग, गोंदियातून चोरी : रेल्वे पोलीस व सुरक्षा बलाच्या जवानांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी संयुक्त कारवाई करून एका मोटारसायकल चोराला पकडले. त्याच्यांजवळून चोरीच्या १९ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. या सर्व मोटारसायकल नागपूर, दुर्ग व गोंदिया रेल्वे स्थानकावरून पळविल्याचे पुढे आले आहे.२५ डिसेंबरला आमगाव ठाण्यांतर्गत येणाऱ्या सितेपार येथील दुर्गेश वासुदेव कटरे यांनी रात्री ९.३० वाजता रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात केलेल्या तक्रारीनुसार ते आपल्या आईवडीलांना रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी आले होते. दरम्यान त्यांची मोटारसायकल एमएच ३५/टी-२२४७ ही चोरीला गेली. रेसुबच्या टास्क चमूने उपनिरीक्षक विनेक मेश्राम, मुख्यआरक्षक पी. दलाई, आरक्षक पी.एल.पटेल, विकास पटले, आर.डी.टेकाम, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक एस.एस. बघेल, रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे, पी.भिमटे, आरक्षक पी.मिश्रा यांनी प्रभारी निरीक्षक एस.किरण व ठाणेदार डी.एम.नालट यांच्या मार्गदर्शनात सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेतली. फुटेजच्या आधारवर आरोपीचा शोध घेणे सुरू केले. २७ डिसेंबरला दुपारी १ वाजता श्री टॉकीज चौकातील दारू दुकानाजवळ एक व्यक्ती मोटरसायकल एमएच ३५/टी-२२४७ ला धक्का देत नेत असताना आढळला.त्याला पकडल्यावर त्याने वाल्मिकी लोकचंद हरिणखेडे (३४) रा. कुºहाडी (पाथरी) गोरेगाव असे नाव सांगितले. त्या दारू दुकानाजवळ उभी असलेली मोटारसायकल एमएच ३१ सी यू ६४७४ ही चोरीची असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात झालेल्या मोटारसायकल चोरीचे फुटेज पाहिले असता तोच इसम ती मोटारसायकल चोरी करताना आढळला. विचारपूस केल्यावर त्याचा एक मित्र कुºहाडी येथील भुºया काटेवार (३०) त्याला सहकार्य करीत असल्याचे सांगितले. त्याच्याजवळही चोरीचे वाहन असल्याची माहिती दिली. पोलिसांनी वाल्मिकी या आरोपीच्या घरी धाड घातल्यावर त्याच्या अंगणात एमएच ४० आर ४०११ व एमएच ३५ एन ५२०२ ही मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. त्याच्या मित्राच्या घराच्या अंगणातून पाच मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. भुºया पोलिसांच्या हातात लागला नाही. अधिक विचारपूस केल्यावर वाल्मिकीने दिलेल्या माहितीनुसार नागपूर, दुर्ग, गोंदिया रेल्वे स्थानकातून १५ ते २० मोटरसायकल चोरण्यासाठी मास्टर चाबीचा वापर करीत असल्याचे सांगितले. चोरी केलेले वाहन नातेवाईकांना व मित्रमंडळींना अत्यंत गरज असल्याचे दाखवून विक्री केल्याची कबुली त्यांनी दिली. जप्त करण्यात आलेल्या १९ मोटारसायकलची किंमत १० लाख ३० हजार रूपये असल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस