शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
6
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
7
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
8
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
9
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
10
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
11
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
12
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
13
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
15
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
16
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
17
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
18
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
19
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
20
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?

सराईत चोरट्यास वेगवेगळ्या गुन्ह्यात १८ महिन्यांची शिक्षा

By admin | Updated: August 3, 2016 00:29 IST

येथील नागरिकांची झोप उडविणारा सराईत चोरटा प्रविण अशोक डेकाटे (२२) याला येथील न्यायदंडाधिकारी आर. व्ही. डफरे यांनी ...

सराईत चोरट्यास वेगवेगळ्या गुन्ह्यात १८ महिन्यांची शिक्षा मोहाडी : येथील नागरिकांची झोप उडविणारा सराईत चोरटा प्रविण अशोक डेकाटे (२२) याला येथील न्यायदंडाधिकारी आर. व्ही. डफरे यांनी वेगवेगळ्या चार गुन्ह्यात १८ महिन्याची शिक्षा सुनावली आहे. १३ सप्टेंबर २०१४ ला विरेंद्र निखारे रा.टिळक वॉर्ड यांच्या घराच्या मागच्या दरवाज्याची कडी काढून अलमारीतील १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला होता. १७ सप्टेंबर २०१४ ला साजीद शेख रा.नेहरु वॉर्ड यांच्या घराच्या खिडकीतून रात्रीला घरात प्रवेश करुन ३३ हजारांचा मुद्देमाल चोरी गेला होता. या गुन्ह्यात मोहाडी पोलीस ठाण्यात कलम ४५७, ३८० भादंविनुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यापूर्वी २६ आॅगस्ट २०१४ ला खुशाल निमजे यांच्या घरासमोर ठेवलेली त्यांची दुचाकी एम एच ३६ एम ८६१३ चोरीला गेली होती. २८ आॅगस्ट २०१४ ला निखिल सुरेश सुखदेवे रा. टिळक वॉर्ड यांच्या घरी ठेवलेली टिव्हीएस फोर्ट ही दूचाकी चोरीला गेली होती. या गुन्ह्यात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वारंवारच्या चोऱ्यामुळे पोलिसांवर नागरिकांचा दबाव वाढत होता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्रविण डेकाटे याला अटक केली. त्याच्यावर दोन घरफोडीचे व दोन दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल केले. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांच्या मार्गदर्शनात जगन्नाथ गिऱ्हेपुंजे, राजेश बापरे यांनी पुरावे गोळा करून गुन्ह्यातील सोन्याचे दागिने व चोरी गेलेल्या दुचाकी हस्तगत केली. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जगन्नाथ गिऱ्हेपुंजे यांनी सादर केलेल्या पुराव्याच्या आधारावर विरेंद्र निखारे यांच्या कडील चोरीच्या गुन्ह्यात सहा महिन्याची शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड व न भरल्यास एक महिना शिक्षा तसेच साजीद शेख यांच्या गुन्ह्यात सहा महिन्याची शिक्षा व दोन हजार रुपये दंड तसेच दोन दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात प्रत्येकी तीन तीन महिन्याची शिक्षा व प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)