शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

१७८ शाळांमध्ये तक्रारपेटीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 20:36 IST

विद्यार्थी आपल्या समस्या बहुतांश वेळा शिक्षकांकडे सांगू शकत नाही. कुठल्याही प्रकारच्या समस्या तोंडी सांगण्यापेक्षा लिखीत मांडणे विद्यार्थ्यांना सोईचे वाटते. यासाठी प्रत्येक शाळेत तक्रार पेटी असणे आवश्यक असताना जिल्ह्यातील १६६१ पैकी १७८ शाळांमध्ये तक्रारपेट्याच नसल्याची बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्दे१४८३ शाळेत तक्रारपेट्या : तक्रार करावी कुणाकडे?

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्यार्थी आपल्या समस्या बहुतांश वेळा शिक्षकांकडे सांगू शकत नाही. कुठल्याही प्रकारच्या समस्या तोंडी सांगण्यापेक्षा लिखीत मांडणे विद्यार्थ्यांना सोईचे वाटते. यासाठी प्रत्येक शाळेत तक्रार पेटी असणे आवश्यक असताना जिल्ह्यातील १६६१ पैकी १७८ शाळांमध्ये तक्रारपेट्याच नसल्याची बाब पुढे आली आहे.शाळांमध्ये तक्रारपेट्या नाहीत तर विद्यार्थी आपल्या समस्या कशा मांडणार असा प्रश्न उद्भवत आहे. आपल्या समस्या व गाºहाणी थेट शिक्षकांसमोर जाऊन सांगणे विद्यार्थ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या लेखी स्वरुपात सरळ मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी प्रत्येक शाळेत तक्रारपेटी ठेवणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्यातील १६६१ पैकी फक्त १४८३ शाळांमध्ये तक्रार पेट्या असून उर्वरित १७८ शाळांमध्ये तक्रारपेट्याच नाहीत.यांतर्गत, आमगाव तालुक्यात १५४ शाळा असून १३६ शाळांमध्ये तक्रारपेट्या असून १८ शाळांमध्ये तक्रारपेट्या नाहीत. गोंदिया तालुक्यातील ४१३ शाळांपैकी २६९ शाळांमध्ये तक्रारपेट्या असून १४४ शाळांमध्ये तक्रारपेट्या नाहीत. तर सडक-अर्जुनी तालुक्यातील १७१ शाळांपैकी १५५ शाळांमध्ये तक्रारपेट्या असून १६ शाळांमध्ये तक्रारपेट्या नाहीत.पाच तालुक्यातील सर्व शाळांमध्ये तक्रारपेट्याअर्जुनी-मोरगाव, देवरी, गोरेगाव, सालेकसा व तिरोडा या पाचही तालुक्यातील संपूर्ण शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी तक्रारपेट्या बसविण्यात आल्या आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २१२, देवरी तालुक्यातील २०८, गोरेगाव तालुक्यातील १५८, सालेकसा तालुक्यातील १४३ तर तिरोडा तालुक्यातील २०२ शाळांत तक्रारपेट्या बसविण्यात आल्या आहेत.