शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

१७०० बालमजूर मुख्य प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:36 IST

शहरातील कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणे, नदीतील रेतीतून सोने शोधणाऱ्या, रेल्वेत भीक मागणाऱ्या, मांग-गारूडी, पेंढारी व शाळाबाह्य बालमजुरांना त्यांचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी सरकारने बालसंक्रमण शाळा सुरू केल्या.

ठळक मुद्देजिल्ह्यात १६ विशेष प्रशिक्षण केंद्र : तीन बालमजूर झाले इंजिनियर

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणे, नदीतील रेतीतून सोने शोधणाऱ्या, रेल्वेत भीक मागणाऱ्या, मांग-गारूडी, पेंढारी व शाळाबाह्य बालमजुरांना त्यांचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी सरकारने बालसंक्रमण शाळा सुरू केल्या. सन २००६ ते २०१८ या कालावधीत जिल्ह्यात १७०० बाल कामगारांना मुख्यप्रवाहात आणले आहे. त्यांना शिक्षणांसाठी नियमित जि.प. शाळेत दाखल करण्यात आले. यात १० वी १२ वी होणारी शेकडो मुले आहेत.बाल कामगारांना पकडणे व त्यांना शाळेत टाकून मोकळे होण्याचे काम अनेक जिल्ह्यात होत असते. परंतु गोंदिया जिल्ह्याने बाल कामगारांसंदर्भात नेहमी चांगली भावना ठेवून त्यांना यशस्वी नागरिक घडविण्याचा प्रयत्न गोंदिया जिल्हा प्रशासनाने केला आहे. जिल्ह्यात पाच ते १० हजाराच्या घरात बालमजूर असले तरी शासनाकडे त्यांची नोंद आतापर्यंत एकूण १७०० करण्यात आली आहे.या बालमजुरांसाठी गोंदिया शहराच्या यादव चौकात, मुर्री, गोंडीटोला, गौतमनगर, कुडवा, सुंदरनगर, गड्डाटोली, छोटा गोंदिया, अदासी, तिरोडा, काचेवानी, एकोडी (नवरगाव), मुंडीकोटा,भीमनगर (घोगरा), सालेकसाच्या बाबाटोली व मुरकुटडोह दंडारी येथे शाळा उघडण्यात आल्या आहेत. त्या बाल मजुरांना त्यांचा मूलभूत हक्क मिळावा. यासाठी शासन तत्परता दाखवून बाल कामगारांच्या उत्थानासाठी कार्य करीत आहेत.यात १० वी व १२ होणारे शेकडो बालकामगार जिल्ह्यात आहेत. शिक्षण घेताना मृत पावलेल्या दोन बाल कामगारांच्या पालकांना प्रत्येकी १५ हजार रूपये असे ३० हजार रूपये मदत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे. आजघडीला ४५४ बालमजूर शिक्षण घेत आहेत.त्यांची पावले वळू लागली उच्च शिक्षणाकडेबालकामगारांनी १० वी १२ वी शिक्षण घेतले तर ते पुरे आहे. परंतु गोंदियात पकडलेल्या बालमजुरांनी उच्च शिक्षणाचा ध्यास घेतल्याने आता त्यांना मुख्य प्रवाहात येण्यास अडचण नाही. कामगार कार्यालयाने पकडलेल्या बाल कामगारांना पायभूत शिक्षण दिले आहे. शेकडो बालके १० वी व १२ वी झाले. भीमनगर (मुंडीकोटा) येथील प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेतलेला मुनेश शेंडे या विद्यार्थ्यांने डीएड पूर्ण केले आहे. सदर प्रकल्पांतर्गत शिक्षक निर्देशक या पदावर सद्या कार्यरत आहे. कुडवा येथील संजय कांबळे हा विद्यार्थी सध्या भंडारा येथे इलेक्ट्रीक इंजिनियर म्हणून पदवी घेतली आहे. आणखी दोन मुले इंजिनियरींग करीत आहेत.संगोपन करते शासनबालसंक्रमण शाळेत शिकणाºया बालकांना दर महिन्याला ४०० रूपये निर्वाहभत्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. त्यांची नोंदणी शाळेत झाल्यावर त्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके देऊन त्यांच्यासाठी मध्यान्ह भोजनाची सोय देखील करण्यात आली आहे. या संगोपनामुळे त्यांना मुख्य प्रवाहात येण्यास मोलाची मदत होत आहे.