शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
4
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
5
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
6
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
7
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
8
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
9
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
10
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
11
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
12
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
13
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
14
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

१.६९ लाख विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

By admin | Updated: January 26, 2016 02:35 IST

गोंदिया जिल्ह्यातील १६८३ शाळांतील १ लाख ६८ हजार ७९९ विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त जीवनाची शपथ २२ व २३ जानेवारी रोजी

नरेश रहिले ल्ल गोंदियागोंदिया जिल्ह्यातील १६८३ शाळांतील १ लाख ६८ हजार ७९९ विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त जीवनाची शपथ २२ व २३ जानेवारी रोजी घेतली. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित हजारोे नागरिकांनी तंबाखू, खर्रा व इतर कोमतेही व्यसन करणार नाही, अशी शपथ घेतली. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदियात झालेल्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या निमीत्ताने जिल्हाभरातील शाळांतील विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. जि.प. व्यवस्थापनाच्या १६८३ शाळांतील १ लाख ६८ हजार ७९९ विद्यार्थ्यानी ही शपथ घेतली. शिक्षण विभागाने प्रत्येक मुख्याध्यापकावर तंबाखू सोडण्याची शपथ घेण्यात यावी अशी जबाबदारी सोपविल्याने मुख्याध्यापकांनी प्रार्थनेच्या वेळी शपथ देऊन विद्यार्थ्यानी व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प केला. अनेक ठिकाणी गावकरीही उपस्थित होते. आमगाव तालुक्यातील १५८ शाळांतील १५ हजार २७७ विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २१४ शाळांतील २० हजार २४४ विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. देवरी तालुक्यातील २१० शाळांतील १५ हजार १७ विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. गोंदिया तालुक्यातील ४०९ शाळांतील ५६ हजार ५७३ विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. गोरेगाव तालुक्यातील १६० शाळांतील १४ हजार ८२९ विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. सडक-अर्जुनी तालुक्यातील १७६ शाळांतील १४ हजार ३४० विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. सालेकसा तालुक्यातील १५६ शाळांतील १० हजार ६९१ विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. तिरोडा तालुक्यातील २०१ शाळांतील २१ हजार ८२८ विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. जिल्ह्यातील १६८४ शाळांतील एक लाख ६८ हजार ७९९ विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्त जीवनाची शपथ घेतली.वर्षभर करणार जनजागृती४विद्यार्थी तंबाखूपासून दूर राहावी यासाठी शिक्षण विभागाकडून प्रत्येक शाळेत जनजागृतीपर वर्षभर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. विविध लोकांचे मार्गदर्शन आयोजित करणे, विद्यार्थ्याची खिशी तपासणे तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ मिळाल्यतास त्या विद्यार्थ्याला शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे.प्रत्येक शाळेत २०० मीटरमध्ये बंदीचे फलक४तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ शाळेच्या आवाराच्या २०० मीटर परिसरात राहणार नाही यासंदर्भात प्रत्येक शाळेकडून फलक लावण्यात आले आहे. शाळेला लागून असलेले पानटपरी किंवा खर्राचे दुकान हटवून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी शाळेकडून प्रयत्न केले जाणार आहे. प्रत्येक शाळांनी २०० मीटरच्या आत तंबाखूबंदीचे फलक लावले किंवा नाही याची चौकशी शिक्षणविभागातील अधिकारी करणार आहेत. अशी होती शपथ४तंबाखू, खर्रा, धूम्रपान ह्यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर ह्या व्यसनापासून दूर राहण्याची शपथ घेत आहे. माझे घर आणि माझ्या आजूबाजूचा परिसर तंबाखूमुक्त राहावा ह्यासाठी मी प्रयत्न करीन. भारत शासनाचा तंबाखू नियंत्रण कायदा गोंदिया जिल्ह्यात लागू करण्यासाठी पुढाकार घेईन. माझी शाळा, माझे गाव आणि माझा गोंदिया जिल्हा तंबाखूमुक्त बनवील.कोदामेडीत आज शेतीवर विशेष ग्रामसभा४प्रजासत्ताक दिनानिमित्त मंगळवारी २६ जानेवारीला जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभेचे आयोजन केले आहे. यावेळची ग्रामसभा खास शेतीवर आधारित होणार असून सडक अर्जुनी तालुक्यातील कोदामेडी या गावी पालकमंत्री राजकुमार बडोले, विशेष मार्गदर्शक ज्ञानेश्वर बोडखे, जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी, सीईओ गावडे प्रामुख्याने उपस्थित राहतील.