शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

१६ हृदयरुग्णांना देणार नवजीवन

By admin | Updated: March 26, 2015 01:13 IST

तिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालयात राष्ट्रीय किशोर सुरक्षा कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील २९ मुला-मुलींची हृदयरोग तपासणी करण्यात आली.

गोंदिया : तिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालयात राष्ट्रीय किशोर सुरक्षा कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील २९ मुला-मुलींची हृदयरोग तपासणी करण्यात आली. यात सर्वच मुला-मुलींची निवड पुढील तपासणीसाठी करून वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात त्यांना दोन अ‍ॅम्बुलंसद्वारे नागपूरला पाठविण्यात आले. तेथील तपासणीत १६ मुलांना जन्मापासूनच हृदयरोग असल्याचे निदान झाले आहे. तिरोडा उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली बाल रोग तज्ज्ञ डॉ. रेखा दुबे यांनी सर्व २९ मुला-मुलींची तपासणी केली व २ डी इको तपासणीसाठी निवड केली. सर्व मुलांची प्राथमिक तपासणी डॉ. प्रिया ताजने, डॉ. श्रद्धा चौधरी, डॉ. निलेश लोथे, डॉ. डोंगरे यांनी केली होती. यानंतर दोन अम्बुलंसची व्यवस्था करून मंगळवार (दि.२४) रोजी सकाळी ९ वाजता पुढील तपासणीसाठी सर्वांना नागपूरला रवाना करण्यात आले. नागपूर येथील श्रीकृष्णा हृदयालया अ‍ॅण्ड क्रिटिकल केअर सेंटरचे हृदय रोग तज्ज्ञ डॉ. महेश फुलवानी यांनी २ डी इको तपासणी केली. यात १६ मुलांना जन्मापासून हृदयरोग असल्याचे उघड झाले. तर काही मुलांवर त्वरित शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे मुलांचे जीव वाचविण्यास मदतच झाली.राष्ट्रीय किशोर सुरक्षा कार्यक्रमांतर्गत मुला-मुलींच्या हृदयरोग तपासणीसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली तिरोडा उपजिल्हा रूग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)काही मुलांना त्वरित शस्त्रक्रियेची गरजराष्ट्रीय किशोर सुरक्षा कार्यक्रमांतर्गत तिरोडा उपजिल्हा रूग्णालयातून २९ मुलामुलींना हृदयरोगाच्या २ डी इको तपासणीसाठी नागपूर येथील श्रीकृष्णा हृदयालया अ‍ॅण्ड क्रिटिकल केअर सेंटर येथे पाठविण्यात आले होते. तेथील तपासणीत २९ पैकी १६ मुलांना जन्मापासूनच हृदयरोग असल्याचे निदान झाले आहे. आता यापैकी काही मुलांना गंभीर स्वरूपाचे हृदयरोग असून त्यांना त्वरित शस्त्रक्रियेची गरज पडू शकते, असे तिरोडा उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांनी सांगितले.