शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
2
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
3
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
4
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
5
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
6
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
7
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
8
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
9
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
10
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
11
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
12
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
13
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
14
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
15
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
16
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
17
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
18
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
19
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
20
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला मिळणार मानव विकासच्या अतिरिक्त १६ बसेस

By admin | Updated: June 25, 2014 23:49 IST

शासनाने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत एसटीच्या स्कूल बसेस सुरू केल्या. गतवर्षी तालुकानिहाय प्रत्येक तालुक्यासाठी प्रत्येकी पाच बसेसची व्यवस्था करण्यात

एसटी महामंडळ : स्कूल बस आजपासून सुरू, १ जुलैपासून होणार नियमित फेऱ्यादेवानंद शहारे - गोंदियाशासनाने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत एसटीच्या स्कूल बसेस सुरू केल्या. गतवर्षी तालुकानिहाय प्रत्येक तालुक्यासाठी प्रत्येकी पाच बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. त्यातच शासनाने आता प्रत्येक तालुक्याला पुन्हा अधिकच्या दोन बसेस देण्याचे प्रस्तावीत केले आहे. त्यानुसार आता गोंदिया जिल्ह्याला आठ तालुक्यांसाठी १६ बसेस मिळणार आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुक्यासाठी आता पाच अधिक दोन अशाच सात स्कूल बस राहणार आहेत. एसटी महामंडळाच्या गोंदिया आगारात एकूण चार तालुक्यांचा समावेश होतो. यात गोंदिया, गोरेगाव, आमगाव व सालेकसा या तालुक्यांचा समावेश आहे. या चार तालुक्यांसाठी गोंदिया आगाराला मानव विकास कार्यक्रमाच्या एकूण आठ स्कूल बसेस मिळणार आहेत. पूर्वीच्या २० व आताच्या आठ मिळून मानव विकासच्या एकूण २८ बसेस आता गोंदिया आगारात असतील. तिरोडा तालुक्यासाठी तिरोडा आगारात पूर्वीच्या पाच व आताच्या दोन मिळून सात स्कूल बस असतील. याशिवाय गोंदिया जिल्ह्यातील देवरी, सडक/अर्जुनी व मोरगाव/अर्जुनी या तालुक्यांसाठी साकोली आगाराला यंदा सहा स्कूल बसेस मिळणार आहेत. त्यामुळे पूर्वी १५ व आताच्या ६ अशा एकूण २१ स्कूल बसेस आता सदर तिन्ही तालुक्यात धावणार आहेत. यंदा मिळणाऱ्या या नवीन स्कूल बसेस चालविण्यासाठी जि.प. गोंदियाकडून रस्त्यांचे निरीक्षण करण्यात आले आहे. या निरीक्षणात काही रस्त्यांवर विद्युत तारांची समस्या आहे. काही रस्ते या बसच्या रहदारीसाठी अयोग्य आहेत. तर काही रस्त्यांवर बांधण्यात आलेले पूल लहान आहेत. मात्र मानव विकास कार्यक्रमाच्या बसेस मोठ्या असल्याने या मार्गावरून त्यांना चालविणे कठीण जाणार असल्याचे निरीक्षणात आढळले. काही गावच्या सरपंचांनी लहान बसेस चालविण्याची मागणी केली आहे. मात्र मानव विकास कार्यक्रमांतर्गत मिळणाऱ्या बसेस आकाराने मोठ्या आहेत. याच बसेस त्या मार्गाने चालवाव्या लागणार असल्याने समस्या उद्भवणार आहे. तिरोडा तालुक्यात धावणाऱ्या स्कूल बसेस : १) तिरोडा-गोरेगाव बस चिखली, इंदोरा, मंगेझरी मार्गे धावेल. तिरोड्यातून सुटण्याची वेळ सकाळी ८.४५ व दुपारी ३ वाजता, गोरेगाववरून परतीची वेळ सकाळी १० व सायंकाळी ४.१५ वाजता. २) तिरोडा-घोगरा बस मांडवी, मुंडीपार, चांदोरी, घाटकुरोडा मार्गे धावेल. तिरोड्यातून सुटण्याची वेळ सकाळी ६ व दुपारी १ वाजता. घोगऱ्यावरून परती वेळ सकाळी ६.४० व दुपारी १.४० वाजता. ३) तिरोडा-गोंदिया बस धापेवाडा मार्गे, सुटण्याची वेळ सकाळी ९.१५ व गोंदियातून परतीची वेळ सकाळी ११ वाजता. ४) तिरोडा-गोंदिया बस दवनीवाडा मार्गे, तिरोड्यातून सुटण्याची वेळ सकाळी ९.३० व दुपारी ३ वाजता, गोंदियावरून निघण्याची वेळ सकाळी ११.३० व सायंकाळी ४.३० वाजता. ५) तिरोडा-अर्जुनी बस सुटण्याची वेळ सकाळी ६.४० व परतीची वेळ सकाळी ७.१५ वाजता. ६) तिरोडा-वडेगाव बस सुटण्याची वेळ सायंकाळी ५.१५ व परतीची वेळ ५.४५ वाजता राहील.