शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीचा लैंगिंक छळ करणाऱ्या नराधमाला १५ वर्षाचा सश्रम कारावास

By नरेश रहिले | Updated: February 21, 2024 20:40 IST

जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाचा निकाल: चार हजार रूपये दंडही ठोठावला.

गोंदिया: मालकाच्या ६ वर्षाच्या पुतणीचा लैंगीक छळ करणाऱ्या नंगपूर्रा मुर्री येथील मजुराला जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने १५ वर्षाचा सश्रम कारावास व ४ हजार रूपये दंड ठोठावला. विक्रम उर्फ सन्नी देवसिंग ठाकुर (२४र्रा . नंगपुरा मुर्री, ता.जि. गोंदिया असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश क्रमांक २ एन. डी. खोसे यांनी केली आहे.

आरोपी सन्नी ठाकूर हा पिडीतेच्या घराच्या वरच्या माळयावर थैले तयार करण्याचा कारखान्यात मजुरीने थैले शिवण्याचे काम करीत होता. १ डिसेंबर २०१६ ते १५ डिसेंबर २०१६ या दरम्यान ६ वर्ष ६ महिने वयाच्या चिमुकलीवर एकटेपणाचा फायदा घेऊन आरोपी तिचा लैगिंक छळ करायचा. पिडीतेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी विरुध्द १५ डिसेंबर २०१६ रोजी आरोपी विरूध्द भादंविच्या कलम ३७६ (२) (आय) (एन), बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो कायदा) २०१२ चे कलम ४, ६, ९ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मिंलद नवघिरे यांनी केला होता. या प्रकरणात विशेष सरकारी वकील कृष्णा डी पारधी यांनी ७ साक्षदारांची साक्ष नोंदवून घेतली. एकंदरित आरोपीचे वकील व जिल्हा सरकारी वकील महेश एस. चंदवानी यांच्या सविस्तर युक्तीवादानंतर जिल्हा न्यायाधीश क्रमांक २ व विशेष सत्र न्यायाधीश एन. डी. खोसे यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा पुरावा व युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी विक्रम उर्फ सन्नी देवसिंग ठाकुर (२४) रा. नंगपुरा मुर्री,याला शिक्षा सुनावली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक निखिल पिगंळे यांच्या मार्गदर्शनात कोर्ट पैरवी पोलीस हवालदार टोमेश्वरी पटले यांनी केली आहे. अशी सुनावली शिक्षाबाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो कायदा) २०१२ चे कलम ६ अंतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त कारावास, बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो कायदा) २०१२ चे कलम १० अंतर्गत ५ वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त कारावास असा एकुन १५ वर्षाचा सश्रम कारावास व ४ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास प्रत्येकी ३ महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी