शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
2
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
3
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
4
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
5
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
6
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
7
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
8
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
9
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
10
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
11
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
12
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
13
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
14
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
15
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
16
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
17
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
18
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
20
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 

१३९ शाळांना भेटी देऊन होणार तपासणी

By admin | Updated: June 25, 2014 00:32 IST

तिरोडा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी एस.जी. मांढरे यांनी तिरोडा पं.स. अंतर्गत येणाऱ्या सर्व १३९ शाळांना भेटींचे नियोजन केलेले आहे. पटनोंदणी पंधरवडा कार्यक्रमात २६ जून ते १० जुलैपर्यंत

काचेवानी : तिरोडा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी एस.जी. मांढरे यांनी तिरोडा पं.स. अंतर्गत येणाऱ्या सर्व १३९ शाळांना भेटींचे नियोजन केलेले आहे. पटनोंदणी पंधरवडा कार्यक्रमात २६ जून ते १० जुलैपर्यंत शाळांना भेटी देऊन माहिती संकलित करण्यात येणार आहे.तिरोडा पंचायत समिती अंतर्गत एकूण १३९ शाळा आहेत. यात प्राथमिक ३९, उच्च प्राथमिक ६४ आणि माध्यमिक ६ शाळांचा समावेश आहे. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या एक दिवसापूर्वी २५ जूनला वर्ग व शालेय परिसर स्वच्छ करुन शाळेच्या पहिल्या दिवसाकरिता शाळा सुसज्ज कराव्या, पालकभेटी घेण्यात याव्या, शिक्षणाची पालखी काढण्यात यावी, असे निर्देश सर्व मुख्याध्यापकांना गट शिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी दिले आहेत.शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय पोषण आहारात गोड पदार्थाचा समावेश करण्यात यावा, असेही निर्देश मांढरे यांनी मुख्याध्यापकांना दिले आहे. पटनोंदणी पंधरवडा कार्यक्रम २६ जून ते १० जुलैदरम्यान राबविण्यात येणार असून १३९ शाळांना सर्व अधिकारी व कर्मचारी शाळेला भेटी देऊन तपासणी करणार आहेत. शाळाभेटी नियोजनानुसार गशिअ एस.जी. मांढरे संपूर्ण तालुक्यातील कोणत्याही शाळा, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पी.पी. समरीत, डी.बी. साकुरे आणि कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ए.सी. शहारे हे बीट अंतर्गत येणाऱ्या शाळा, सर्व केंद्रप्रमुखांना केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळा आणि विषयतज्ज्ञ ब्रजेश मिश्रा यांना विहिरगांव, सोनेगाव, बालापूर, मलेझरी, चिखली, मेंदिपूरसह आठ शाळा, प्रा.ग. ठाकरे यांना मंगेझरी, कोडेवर्रा, खमारी, इंदोरा, भिवापूरसह नऊ शाळा आणि देवीदास हरडे यांना नवेझरी, नांदलपार, कोयलारी, मारेगाव आणि चोरखमारासह आठ शाळा तसेच अन्य विषयतज्ज्ञांना सात-आठ शाळा तपासायच्या आहेत. शाळा तपासणी कार्यात शाळांकडे देण्यात आलेले आणि राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती घेणे, पोषण आहार, पाठ्यपुस्तका वितरित झाल्या की नाही, शालेय पोषण आहारात गोड पदार्थ, वयोगट ६-१४ दाखल पात्र संख्या किती आणि प्रत्यक्षात दाखल झाले किती अशा विविध मुद्यांची तपासणी संबंधित भेटी देणारे अधिकारी करणार असल्याची माहिती गट समूह साधन केंद्राच्या सूत्रांनी दिली आहे. (वार्ताहर)