शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची गळफास घेवून आत्महत्या

By अंकुश गुंडावार | Updated: May 7, 2025 16:36 IST

आमगाव येथील घटना : कुटुंबीयावर आघात आमगाव

गोंदिया : बारावीच्या परीक्षेचा निकाल ५ मे रोजी लागला. यात अनुउत्तीर्ण झाल्याने आलेल्या नैराश्यातून विद्यार्थ्यांने स्वत:च्या जन्मदिनीच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.७) दुपारी २ वाजता आमगाव येथील बजरंग चौकात उघडकीस आली. क्रिष्णा धर्मराज शिवणकर असे गळफास घेवून आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार क्रिष्णा शिवणकर हा आमगाव येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. यावर्षी त्याने बारावीची परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला. यात क्रिष्णा शिवणकर हा अनुत्तीर्ण झाला. आपले सर्व मित्र उत्तीर्ण झाले मीच अनुउत्तीर्ण झालो यातून त्याला नैराश्य आले. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून तो थोडा नाराज असल्याचे बाेलल्या जाते. क्रिष्णाने बुधवारी घरी कुणीही नसताना गळफास घेवून आत्महत्या केली. त्याचे आईवडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयावर मोठा आघात झाला आहे. कुटुंबीयांनी या घटनेची माहिती आमगाव पोलिस स्टेशनला दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. 

जन्मदिनीच आवळला गळफासक्रिणा शिवणकर या विद्यार्थ्याचा बुधवारी (दि.७) जन्मदिवस होता. क्रिष्णाचा जन्मदिवस असल्याने त्याचे कुटुंबीय सुध्दा आनंदात होते. तो बारावीत अनुत्तीर्ण झाला याची कुठलीही नाराजी न बाळगता पुन्हा चांगला अभ्यास कर आणि उत्तीर्ण हो असे प्रोत्साहान त्याच्या आई-वडीलांनी क्रिष्णाला दिले. मात्र क्रिष्णाच्या मनात काही वेगळेच होते. त्याने घरी कुणीही नसताना जन्मदिन गळफास घेवून आत्महत्या केली.

आई-वडील चालवितात छोटेस हाॅटेल

क्रिष्णाचे वडील धर्मराज शिवणकर यांची आमगाव येथे छोटेसे हॉटेल आहे. ते चहा व नाश्ता तयार करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावायचे. यात क्रिष्णा आणि त्याची आई सुध्दा धर्मराज यांना मदत करायचे. सुटीच्या दिवसात क्रिष्णा सुध्दा वडीलांना मदत करायचा. मात्र क्रिष्णाने गळफास घेवून आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबीयांवर मोठा धक्का बसला.

टॅग्स :gondiya-acगोंदियाEducationशिक्षण