शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

१२४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना बिनकामाचे वेतन

By admin | Updated: March 3, 2016 01:43 IST

गोंदियातील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाला अद्याप ‘एमसीआय’कडून मंजूर मिळाली नाही. लवकर कॉलेज सुरू होणार असे सांगत एक ते दिड वर्षापासून ....

मेडिकल कॉलेजचे भिजत घोंगडे : एकाही रूग्णाची तपासणी नाहीगोंदिया : गोंदियातील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाला अद्याप ‘एमसीआय’कडून मंजूर मिळाली नाही. लवकर कॉलेज सुरू होणार असे सांगत एक ते दिड वर्षापासून या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावावर अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र त्यांना काहीच काम नसल्याने वर्षभरापासून बिनकामाचे वेतन दिले जात आहे. केटीएस किंवा बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात या वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची ड्युटी लावल्यास नागरिकांनाही सेवा मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे.गोंदियात वैद्यकीय महाविद्यालय रूग्णांच्या सेवेसाठी तयार होत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी मेहनत घेऊन गोंदिया जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करवून घेतले. परंतु या वैद्यकीय महाविद्यालयाला मेडिकल कॉन्सील आॅफ इंडियाची परवानगी मिळाली नाही. काही उणीवा असल्याने त्या दूर केल्या जात आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाने वर्ग एकचे १५ अधिकारी, वर्ग २ चे ९ अधिकारी, वर्ग ३ चे ३३ कर्मचारी आणि वर्ग ४ चे ६२ कर्मचारी नियुक्त केले. मागील वर्षभरापासून ते येथे कार्यरत आहेत. परंतु आरोग्य सेवा देण्यासाठी असलेले हे कर्मचारी, अधिकारी प्रत्यक्षात आरोग्य सेवा न देताच वर्षभरापासून कार्यालयात येऊन गप्पा मारणे यापलीकडे काहीही काम करताना दिसत नाही. त्यामुळे शासनाला महिन्याकाठी ३० ते ४० लाखांचा भूर्दंड बसत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाला अंतिम मंजुरी मिळून वर्ग सुरू होण्यास वेळ आहे. त्यामुळे या वैद्यकीय महाविद्यालयासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची (डॉक्टरांची) सेवा केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात किंवा बाई गंगाबाई रुग्णालयात का घेतल्या जात नाही? हा प्रश्न अनुत्तरीत आहेत. एकीकडे केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात डॉक्टरांची कमतरता असताना तेथील डॉक्टरांना अधिक तास काम करावे लागते. असे असताना वैद्यकीय महाविद्यालयासाठी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा घेणे गरजेचे असल्याची भावना गोंदियावासीयांकडून व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)असे आहेत अधिकारी, कर्मचारीशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वर्ग एकचे अधिष्ठाता एक, प्राध्यापक ४, सहयोगी प्राध्यापक १०, वर्ग २ चे सहायक प्राध्यापक ९, वर्ग ३ चे वरिष्ट सहाय्यक २, वरिष्ट लिपीक ८, कनिष्ठ लीपीक ११, लघुलेखक ५, तंत्रज्ञ १, प्रयोगशाळा सहाय्यक तंत्रज्ञ ५, कलाकार १,ट्यूटर १, वरिष्ठ निवासी ४ व शिपायांची ६२ पदे असे एकूण १२४ कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत.२५ एकारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयकुडवा येथील वनविभागाच्या २५ एकर जागेवर वैद्यकीय महाविद्यालय तयार होणार आहे. यात शिकवणी वर्ग, हॉस्टेल, ५०० बेडची व्यवस्था राहणार आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावावर आतापर्यंत कोट्यवधी रूपये खर्च झाले परंतु याचा प्रत्यक्षात फायदा रूग्णांना कवडीचाही झाला नाही. कार्यरत अधिकाऱ्यांनी केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात सेवा दिल्यास तेथील डॉक्टरांच्या डोक्यावरील कामाचा ताण कमी होईल व रूग्णांही उत्तम सेवा मिळेल. रूग्ण तपासले शून्यशासकीय महाविद्यालयात १२४ कर्मचारी अधिकारी कार्यरत असून आतापर्यंत या वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत अधिकारी यांनी एकाही रूग्णाची तपासणी केली नाही. किती रूग्णांची तपासणी केली, असे येथील अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया यांना विचारणा केल्यावर त्यांनी कोणाचीही तपासणी केली नाही, असे सांगितले.