शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
9
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
10
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
11
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
12
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
13
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
14
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
16
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
17
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
18
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
19
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
20
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!

१२ हजार ४८ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

By admin | Updated: February 27, 2017 00:11 IST

जिल्ह्यातील वर्ग ५ आणि ८ मधील एकूण १२ हजार ४८ विद्यार्थ्यांची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा

गोंदिया : जिल्ह्यातील वर्ग ५ आणि ८ मधील एकूण १२ हजार ४८ विद्यार्थ्यांची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दि.२६ रोजी जिल्ह्यातील ९७ केंद्रांवरुन दिली. पाचवीतील १२२ विद्यार्थी तर आठवीतील १७५ विद्यार्थी गैरहजर होते. जिल्हा परिषदेच्या आणि खासगी शाळांचे मिळून वर्ग पाचवीचे ६ हजार ८१६ विद्यार्थ्यांनी ५२ केंद्रांवरुन परीक्षा देणे अपेक्षित होते. परंतु ६ हजार ६४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. तर १७५ विद्यार्थी गैरहजर असल्याचे आढळले. तसेच वर्ग आठवीचे ५ हजार ५२९ विद्यार्थी ४५ केंद्रांवरुन परीक्षा देणे अपेक्षित होते. परंतु ५ हजार ४०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १२२ विद्यार्थी या परिक्षेत गैरहजर होते. सकाळी १०.३० पासून सायंकाळी ५ वाजतापर्यंत चाललेल्या या परीक्षेत इयत्ता पाचवीकरिता प्रथम भाषा / गणित तसेच तृतीय भाषा व बुद्धीमत्ता चाचणी तर इयत्ता आठवीकरिता प्रथम भाषा/गणित तसेच तृतीय भाषा व बुद्धीमत्ता चाचणी असे पेपर घेण्यात आले. एकूण ३०० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका होत्या. पहिल्या पेपरची वेळ सकाळी ११ ते दुपारी १२.३० वाजतापर्यंत तर दुसऱ्या पेपरची वेळ दुपारी १.३० ते ३ पर्यंत होती. सदर परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी उल्हास नरड, उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, राजन घरडे, शिक्षण विस्तार अधिकारी निलकंठ सिरसाटे, राजकुमार रामटेके, शिक्षक यु.जी. हरिणखेडे, प्रमोद बघेले व इतरांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)