शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नंबरच्या १२ दुचाकी लपवल्या, विक्रीआधीच जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By नरेश रहिले | Updated: December 17, 2023 16:56 IST

मोटारसायकल चोरी करून विक्री करण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या १२ मोटारसायकलींसह एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

गोंदिया : मोटारसायकल चोरी करून विक्री करण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या १२ मोटारसायकलींसह एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई १६ डिसेंबर रोजी करण्यात आली आहेत. राहुल ऊर्फ चंगा सुखचांद लिल्हारे (२१) रा. अंगुर बगिचा गोंदिया याला भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बाम्हणी येथे अटक केली आहे. त्याने तिरोडा तालुक्यातून दुचाकी चोरल्याचे उघडकीस आल्याने त्याला तिरोडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटार सायकल चोरी व मालमत्ता विषयक गुन्हयातील गुन्हेगारांचा शोध घेण्याचे निर्देश दिलेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटार सायकली चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेत असताना १६ डिसेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार तिरोडा येथील दाखल गुन्ह्यातील मोटार सायकल चोरणारा आरोपी राहुल ऊर्फ चंगा लिल्हारे रा. अंगुर बगीचा गोंदिया हा असल्याचे समजताच त्याची मािहती काढून भंडारा जिल्ह्याच्या बाम्हणी येथून त्याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर त्याने १२ मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्या मोटारसायकलींची किंमत ४ लाख ८८ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, वनिता सायकर, पोलीस हवालदार राजू मिश्रा, महेश मेहर, भुवन देशमुख, चित्तरंजन कोडापे, सोमेंद्र तूरकर, रियाज शेख, इंद्रजित बिसेन, सुजीत हलमारे, लक्ष्मण बंजार, घनश्याम कुंभलवार, संतोष केदार, तिरोडाचे पोलीस निरीक्षक, देविदास कठाडे, पोलीस उपनिरीक्षक पुंडे, पोलीस हवालदार दिपक खांडेकर, पोलीस शिपाई शैलेश दमाहे यांनी केली आहे. तीन जिल्ह्यातून दुचाकी केल्या चोरीमोटारसायकल चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी नागपूर, भंडारा व गोंदिया या तीन जिल्ह्यातून त्याने मोटार सायकली चोरलेल्या आहेत. चोरलेल्या मोटारसायकल तो वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवत होता. या चोरी केलेल्या दुचाकी काही विना क्रमांकाच्या तर काहींना नंबरच नसल्याचे लक्षात आले.

टॅग्स :gondiya-acगोंदियाtheftचोरी