शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

१११ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित

By admin | Updated: April 3, 2017 01:42 IST

मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय हिराटोला येथील तब्बल १११ विद्यार्थ्यांचे फार्म स्पॉट अ‍ॅडमिशन

पत्रपरिषद : कैलाश डोंगरे यांचा आरोप गोंदिया : मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय हिराटोला येथील तब्बल १११ विद्यार्थ्यांचे फार्म स्पॉट अ‍ॅडमिशन हे कारण पुढे करून कोषागार अधिकाऱ्यांनी परत पाठविल्याचा आरोप संस्थाध्यक्ष कैलाश डोंगरे यांनी पत्रपरिषदेत केला. याप्रसंगी संस्थाध्यक्ष कैलाश डोंगरे यांच्यासह संचालक सूर्यकांत डोंगरे व शैलेंद्र डोंगरे उपस्थित होते. डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेद्वारे आॅनलाईन प्रवेश अर्ज मागवून गुणानुक्रमे प्रत्येक महाविद्यालयाला शीट अलॉट केल्या जातात. प्रवेश क्षमतेच्या ८० टक्के जागा शासकीय कोट्यातून कॅप राऊंडद्वारे भरल्या जातात. यात ८० टक्के जागा न भरल्या गेल्यास शिल्लक जागा प्रवेश प्रक्रिया नियमावलीनुसार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेच्या दिलेल्या तारखेनुसार महाविद्यालयीन स्तरावर भरल्या जातात. त्यांना स्पॉट राऊंड नाव दिले जाते व त्यांना अलॉटमेंट लेटरदेखील मिळतो. यात सन २००९-१० पासून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन २०१२-१३ पर्यंत शासन नियमानुसार शिष्यवृत्ती मिळत होती. परंतु २०१२-१३ च्या मार्च महिन्यात जिल्हा कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे रूजू झाल्यानंतर त्यांनी स्पॉट राऊंडमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही म्हणून फार्म समाजकल्याण आयुक्त यांना परत पाठविले. परंतु राज्याच्या इतर जिल्ह्यातील कायम विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या कृषी महाविद्यालयांना स्पॉट राऊंडमध्ये शिष्यवृत्ती मिळत होती. तोच आधार गोंदिया जिल्ह्याला देखील लागू होईल, अशी धारणा होती. मात्र जिल्हा कोषागार अधिकारी शासकीय परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून स्पॉट राऊंड म्हणजे महाविद्यालयाने स्वत:च्या जागा भरण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश दिला, असे गृहित धरून त्यांची शिष्यवृत्ती नाकारत आहेत, असा आरोप कैलाश डोंगरे यांनी केला. याबाबत जिल्हा कोषागार अधिकारी नेमाडे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शासन निर्णय (इबीसी-२०१५/प्र.क्र. ४६/शिक्षण-१, मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई, दिनांक ३० मार्च २०१५) पाठवून सदर बाबीचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे. या शासन निर्णयानुसार, राबविलेल्या प्रवेश प्रक्रियेतून अथवा शासनाच्या सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ते त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहील. मात्र सदर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर संस्था स्तरावर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या अशा प्रवेशांंना प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिली असली तरी या योजनेचा लाभ होणार नाही, असे आहे. तसेच राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कार्यतर मान्यताप्राप्त खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित विद्यालय/ महाविद्यालयामधील शासकीय कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती योजना लागू राहील, असे आहे. या प्रकारामुळे सर्वत्र सावळा गोंधळ असून विद्यार्थी मात्र संभ्रमात पडले आहेत. मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय हिराटोला येथील तब्बल १११ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती फार्म स्पॉट अ‍ॅडमिशन म्हणून नाकारण्यात आल्याने त्यांच्यामध्ये असंतोष खदखदत आहे. आता संस्था, समाजकल्याण विभाग व कोषागार अधिकारी कोणता निर्णय घेतात की न्यायालय स्तरावर लढा दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)