शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

शहरवासीयांवर १०.५३ कोटी थकीत

By admin | Updated: January 25, 2015 23:15 IST

नगर परिषदेच्या कर वसुलीचा विषय सध्या शहरात चांगलाच गाजत असतानाच आता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण सुद्धा कर वसुलीसाठी मैदानात उतरली आहे. प्राधिकरणचे शहरवासीयांवर

मजिप्राचे टेंशन वाढले : वसुलीसाठी दोन पथक कामावरगोंदिया : नगर परिषदेच्या कर वसुलीचा विषय सध्या शहरात चांगलाच गाजत असतानाच आता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण सुद्धा कर वसुलीसाठी मैदानात उतरली आहे. प्राधिकरणचे शहरवासीयांवर १० कोटी ५३ लाख ८३ हजार ४५३ रूपये पाणीपट्टी करापोटी थकून आहे. वाढत चाललेल्या या आकड्यामुळे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे टेंशन वाढले असून त्यामुळेच त्यांनीही आपले पथक वसुलीसाठी कामावर लावले आहेत. कर वसुलीत होत असलेल्या ढिलाईमुळे नगर परिषदेचाही आकडा वाढत गेल्याने यंदा त्यांना ११ कोटीचे टार्गेट सर करायचे आहे. यामुळे परिषद वांद्यात आली असून त्यांनीही पथक गठित करून कर वसुली सुरू केली आहे. विशेष म्हणजे या पथकासोबत परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही मैदानात उतरावे लागले आहे. परिणामी शहरात नगर परिषदेची कर वसुली मोहीम चांगलीच गाजत आहे. त्यात आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे पथक वसुलीसाठी निघाल्याचे दिसून येत आहे. कारण प्राधिकरणला शहरवासीयांकडून १० कोटी ५३ लाख ८३ हजार ४५३ हजार रूपयांची पाणी पट्टी कर वसुली करायची आहे. प्राधिकरणकडून हा आकडा कमी करण्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे पडत असल्याने थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे. तसे प्राधिकरणला पाणी पुरवठा योजना निर्माण करून स्थानीक स्वराज संस्थेला सुपूर्द करायची असते. मात्र नगर परिषदेने येथील योजना आपल्या अधिकारात घेण्यास इच्छा दाखविली नाही. परिणामी प्राधिकरणला इच्छा नसतानाही येथील योजना चालवावी लागत आहे. (शहर प्रतिनिधी)१०.५३ कोटींची थकबाकी कुणावर आजघडीला गोंदिया शहराला ११ हजार कनेक्शन्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत आहे. त्याचीच थकबाकी १० कोटी ५३ लाख ८३ हजार ४५३ रूपये एवढी आहे. यातील नऊ कोटी ४६ लाख सहा हजार २६९ रूपये घरगुती कनेक्शनधारकांवर, ८६ लाख ३० हजार ७५५ रूपये व्यवसायीक कनेक्शन धारकांवर तर २१ लाख ४६ हजार ४२९ रूपये नगर परिषदेवर थकून आहेत. विशेष म्हणजे शहरवासीयांवर सहा कोटी ३९ लाख ३१ हजार १२३ रूपयांचे पाणीपट्टी कर थकीत आहे. उर्वरीत चार कोटी १४ लाख ५२ हजार ३३० रूपये ही व्याजाची रक्कम आहे. आता शहरवासी पाण्याचे पैसे देत नसताना व्याजाची रक्कम कशी काय देणार असा प्रश्न येथे पडतो. दोन पथक करताहेत वसुलीशहरवासीयांवर थकून असलेल्या रकमेच्या वसुलीसाठी प्राधिकरणने दोन पथक गठित केले आहेत. या पथकात प्रत्येकी पाच जणांचा समावेश असून ते प्राधिकरणचेच कर्मचारी आहेत. हे दोन्ही पथक शहरातील थकबाकीदारांकडे जाऊन थकीत करवसुली करीत आहेत.