शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू विक्रेत्यांकडून तब्बल 10.35 लाखांचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 05:00 IST

अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाया सुरू आहेत. यातून पोलिसांनी त्यांचा मोठ्या प्रमाणात माल जप्त केला आहे. मात्र यानंतरही अवैध दारू विक्रेता एवढ्या मोठ्या प्रमाणात मोहा कोठून आणतात हे समजण्यापलिकडे आहे. त्यात आता होळी जवळ आली असून त्यासाठी अवैध दारू विक्रेत्यांनी तयारी सुरू केली आहे. अशात आता सातत्याने कारवाया सुरू राहणार असून कुणालाही माहिती मिळाल्यास त्याने माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलीस कंबर कसून तयार आहेत व यातूनच दारू विक्रेत्यांवर सातत्याने धाडसत्र सुरू आहे. अशातच होळीचा सण बघून मोठ्या दारू काढण्याच्या तयारीत असलेल्या ६ दारू विक्रेत्यांना पोलिसांनी दणका दिला आहे. बुधवारी (दि. ९) सकाळी ७ वाजता शहरातील संत रविदास वॉर्ड येथे पोलिसांनी धाडी टाकून अवैध दारू विक्रेत्यांकडून तब्बल १० लाख ३५ हजार ८७० रुपयांचा माल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी,  दिलीप घनश्याम बरेकर (३७) याच्या दारू अड्ड्यावर धाड टाकून ७३ हजार रुपये किमतीची ३६५ लिटर मोहादारू, तीन लाख चार हजार रुपये किमतीचा ९५ प्लास्टिक चुंगडीत ३८०० किलो मोहा सडवा, नऊ हजार २७० रुपये किमतीचे  हातभट्टी लावण्याचे साहित्य, असा एकूण तीन लाख ८६ हजार २७० रुपयांचा माल जप्त केला. शांता बाबुराव बरेकर (५८) हिच्या दारू अड्ड्यातून एक लाख ८५ हजार ६०० रुपये किमतीचा ५८ प्लास्टिक चुंगडीत २३२० किलो सडवा, शीला विनोद खरोले (४०)  हिच्या दारू अड्ड्यातून एक लाख ९८ हजार ४०० रुपये किमतीचा ६२ प्लास्टिक चुंगडीत २४८० किलो सडवा, कविता सेवकराम तांडेकर (४५) हिच्या दारू अड्ड्यातून ८६ हजार रुपये किमतीचा २८ प्लास्टिक चुंगडीत १०८० किलो सडवा, साबीर रहीम पठाण (५२) याच्या दारू अड्ड्यातून एक लाख आठ हजार ४०९ रुपये किमतीचा ३४ प्लास्टिक चुंगडीत १३६० किलो सडवा तसेच तोसीफ सलीम पठाण (३०) याच्या दारू अड्ड्यातून ७० हजार ४०० रुपये किमतीचा २२ प्लास्टिक चुंगडीत ८८० किलो सडवा,  असा एकूण १० लाख ३५ हजार ८७० रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार योगेश पारधी, हवालदार भाटिया, नायक पोलीस शिपाई वाढे, दमाहे,  सपाटे, चालक शेख आणि १५ होमगार्ड सैनिकांनी केली. 

सातत्याने सुरू राहणार कारवाया - अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाया सुरू आहेत. यातून पोलिसांनी त्यांचा मोठ्या प्रमाणात माल जप्त केला आहे. मात्र यानंतरही अवैध दारू विक्रेता एवढ्या मोठ्या प्रमाणात मोहा कोठून आणतात हे समजण्यापलिकडे आहे. त्यात आता होळी जवळ आली असून त्यासाठी अवैध दारू विक्रेत्यांनी तयारी सुरू केली आहे. अशात आता सातत्याने कारवाया सुरू राहणार असून कुणालाही माहिती मिळाल्यास त्याने माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस