शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

१०३५ उमेदवारांनी दिली लेखी परीक्षा

By admin | Updated: June 25, 2014 23:49 IST

परिक्षा शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजतापासून ११.४५ वाजता पर्यंत घेण्यात आली. लेखी परिक्षेसाठी १०७० उमेदवार पात्र झाले होते. परंतु लेखी परिक्षेला ३५ उमेदवार गैरहजर होते. त्यामुळे १०३५ उमेदवारांनी लेखी

३५ उमेदवार गैरहजर : उत्तरपत्रिका उपलब्ध$$्न्न्निेगोंदिया : जिल्ह्यातील ७६ पोलीस शिपाई पदासाठी घेत असलेल्या भरतीची लेखी परिक्षा शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजतापासून ११.४५ वाजता पर्यंत घेण्यात आली. लेखी परिक्षेसाठी १०७० उमेदवार पात्र झाले होते. परंतु लेखी परिक्षेला ३५ उमेदवार गैरहजर होते. त्यामुळे १०३५ उमेदवारांनी लेखी परिक्षा दिली आहे.गोंदिया जिल्ह्यासाठी यावर्षी शासनाने फक्त २३ नवीन जागा दिल्या आहेत. नवीन असलेल्या २३ जागा व सेवानिवृत्तीमुळे रिक्त असलेल्या ५३ जागा अशा ७६ जागांची पोलीस शिपाई भरती जून महिन्यात घेण्यात आली. या भरतीचा शेवटचा टप्पा लेखी परिक्षा शुक्रवारी मुर्रीच्या भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात घेण्यात आली. ७६ जागांसाठी ४२०० अर्ज आले होते. या अर्जदारांचे कागदपत्र पडताळणी व शारिरीक चाचणीसाठी पात्र आहेत किंवा नाही याची पडताळणी केल्यावर शारिरीक चाचणीसाठी २२५० उमेदवार पात्र ठरले. त्यातील १०७० उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले. अत्यंत पारदर्शकरित्या ही संपुर्ण भरती प्रक्रिया करण्यात आली. लेखी परिक्षा देणाऱ्या उमेदवारांत ८०२ पुरूष तर २३३ महिला आहेत. गैरहजर असणाऱ्यांमध्ये ६ महिला व २९ पुरूष आहेत. १०० गुणांसाठी उमेदवारांना दिड तासाचा वेळ देण्यात आला होता. भारतीय खाद्य निगमच्या चार गोदामात ही लेखी परिक्षा घेण्यात आली. पेपर ए, बी, सी, डी अशा चार संचात होता. या पेपरची उत्तरपत्रिका शुक्रवारीच पोलीस अधिक्षक कार्यालय, पोलीस मुख्याल, जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे, महाराष्ट्र पोलीस व गोंदिया पोलीसच्या वेबसाईटवर टाकण्यात आली. स्वत: पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप झळके यांनी उपस्थीत राहून ही परीक्षा घेतली. पावसाचा फटका भरती प्रक्रियेला बसू नये यासाठी भारतीय खाद्य निगमचे गोदाम उपलब्ध करून दिल्यामुळे खाद्य निगमचे पोलीस उप अधिक्षक गृह सुरेश भोयर यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)