शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

१० आरोपींचा शोध सुरू

By admin | Updated: September 14, 2015 01:33 IST

गोंदिया नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे नेता छेदीलाल इमलाह यांच्या हत्येला आता तीन महिने पूर्ण झाले आहेत.

सात आरोपींवर मोक्का : पोलिसांची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारीगोंदिया : गोंदिया नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे नेता छेदीलाल इमलाह यांच्या हत्येला आता तीन महिने पूर्ण झाले आहेत. या हत्याकांडात सहभागी सहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे आतील ७ आरोपींवर मोक्का (महाराष्ट्र गुन्हे प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतरही आरोपींचा शोध संपलेला नाही. अजून १० आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.छेदी इमलाह यांची सायंकाळच्या सुमारास भर चौकात गोळ्या झाडून हत्या झाली होती. या घटनेमुळे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या प्रकरणातील ज्या सहा आरोपींना पोलिसांनी पकडले त्यांच्यापैकी एका आरोपीची जामिनावर मुक्तता झाली आहे. मोक्काच्या आरोपींसाठी असलेल्या नागपूरच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांनी या आरोपींना १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मोक्का लावल्यानंतर अटकपूर्व जामिन रद्द केला जातो. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे पोलीस काही आरोपींचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी दि.१४ ला मोक्का न्यायालयात किंवा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज लावल्या जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी आरोपींची अटकपूर्व जमानत रद्द करण्यासाठी पोलीस सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी करीत आहे.गेल्या १२ जूनला आंबेडकर चौकात झालेल्या या हत्याकांडात शाहरूख खान फिरोज खान पठान (२१), यशोदास हरपाल (२३), लोकेश ऊर्फ कल्लू यादव (३३), सुभम बैरीसाल (१९), छत्रसाल ऊर्फ बंटी बानेवार (४९), जबलपूर निवासी शेखर ऊर्फ अशोक सोनकर (३१) यांना आतापर्यंत अटक झाली आहे. याशिवाय पंकज यादवला उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला आहे. ज्या आरोपींना पोलीस अटक करू इच्छितात त्यांच्या नावांबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)गोंदियात विकल्या १०० पेक्षा जास्त रिव्हॉल्वर?गोंदियात विकल्या १०० पेक्षा जास्त रिव्हॉल्वर?पोलिसांनी अटक केलेल्या जबलपूर येथील आरोपीने गोंदिया शहरात आतापर्यंत १०० पेक्षा जास्त रिव्हॉल्व्हर विकल्याचे पोलिसांना सांगितल्याचे समजते. ज्यांना रिव्हॉल्वहर विकल्याची माहिती सदर आरोपीने दिले त्यांना गाठून पोलीस चांगलीच कमाई करीत असल्याची जोरदार चर्चा आहे.या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, आधी जबलपूर पोलिसांच्या हाती तो लागला त्यावेळी त्याने गोंदिातील पाच आरोपींची नावे सांगितली. जबलपूर पोलीस गोंदियातील पाच आरोपींना पकडून घेऊन गेले. पण नंतर त्यांना सोडून देण्यात आले. गोंदिया पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने तीन जणांचे नाव सांगितले. त्या तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले. त्यापैकी एकाने रिव्हॉल्वर खरेदी केल्याची कबुली दिली. परंतू ती खराब निघाल्याने परत केली. दुसऱ्या एका आरोपीनेही याच पद्धतीने कबुली दिली.