लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : आॅक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका पादर्शकपणे तथा शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची पुर्तता तसेच मतदान केंद्रांबाबतची तपासणी करण्यात आल्याची माहिती अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पंचायत समिती बचत भवनात आयोजित पत्रकार परिषदेला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विनोद मेश्राम, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनील भानारकर उपस्थित होते. शिल्पा सोनाले म्हणाल्या अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी तथा गोरेगाव तालुक्यातील एका महसुली मंडळाचा समावेश असलेल्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात एकूण ३१६ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.या मतदार संघात १ लाख २७ हजार ०५९ पुरूष मतदार तर १ लाख २५ हजार ४४१ महिला मतदार व एक तृतीयपंथी असे एकूण २ लाख ५२ हजार ५०१ मतदार आहेत. आदर्श आचारिसहंता अंमलबजावणीसाठी भरारी पथके, स्थिर पथके, व्हिडिओ सर्वेक्षण पथके, स्थापन करण्यात आली आहे. त्याचे प्रशिक्षण सुद्धा पार पडले. येणाºया विधानसभा निवडणुकीत संपूर्ण पारदर्शकता व मतदारांना वेळोवेळी मतदानासाठी जागृत करण्यासाठी निवडणूक पाठशाला, मतदार यादीचे चावडी वाचन व नवमतदारांचे व दिव्यागांचे मतदान नोंदणीवर विशेष भर देण्यात आल्याचे सोनाले यांनी सांगीतले. मतदार यादीत नाव आहे किंवा नाही किंवा चुकीचे नाव तर नाही ना याची पडताळणी करण्यासाठी विशेष मोहिम राबविली जात आहे. शाळा महाविद्यालयातही १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची नोंदणी मोहिम राबविली जात आहे. येणाºया विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी जातांना वेगवेगळया अकरा प्रकारच्या ओळखपत्रापैकी निवडणूक आयोगाद्वारे प्राप्त मतदान ओळखपत्र मतदान केंद्रावर सोबत आणावे याबाबत मतदारांना आग्रहाने सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचे नामनिर्देशन सादर करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत १८ ते १९ वयोगटातील नवमतदार आणि दिव्यांग मतदारांची नावे नोंदणी करता येतील त्यासाठी आपल्या गावातील बीएलओकडे अर्ज करण्याचे आवाहनही सोनाले यांनी केले. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रांमध्ये महिलांना मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी सडक अर्जुनी तालुक्यात बुथ क्र मांक १३१ व अर्जुनी मोरगावातीव बुथ क्र मांक २५१ मध्ये सखी बुथ स्थापन करण्यात येणार आहे.दिव्यांग मतदान अधिकारीदिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून ज्या बुथवर दिव्यांग मतदार आहेत.तिथे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी दिव्यांग राहणार आहे. बुथ क्र मांक २१३ बोंडगावदेवी येथे व बुथ क्र मांक २३४ अरततोंडी या बुथवर प्रत्येकी चौदा दिव्यांग मतदार आहेत.तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांकविधानसभा क्षेत्रातील ३१ मतदान केंद्रावर थेट प्रक्षेपणाद्वारे लक्ष राहणार आहे. पारदर्शक मतदानासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. संर्पकासाठी टोल फ्री क्र मांक १९५० ठेवण्यात आला आहे. नामनिर्देशन पत्र स्विकारण्याचे ठिकाण व इतर निवडणुकीसंदर्भात कामे उपविभागीय कार्यालय येथे हे मुख्य कार्यालय ठेवण्यात आले आहे.मतमोजणी होणार बाजार समितीतईव्हीएम मशीन ठेवण्याची व मतमोजणीचे ठिकाण बाजार समितीच्या वखार महामंडळाच्या गोदाम परिसरात ठेवण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी दिली. निवडणुकीत मतदान शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अर्जुनी मोरगाव मतदारसंघात ३१६ मतदान केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 06:00 IST
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचे नामनिर्देशन सादर करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत १८ ते १९ वयोगटातील नवमतदार आणि दिव्यांग मतदारांची नावे नोंदणी करता येतील त्यासाठी आपल्या गावातील बीएलओकडे अर्ज करण्याचे आवाहनही सोनाले यांनी केले.
अर्जुनी मोरगाव मतदारसंघात ३१६ मतदान केंद्र
ठळक मुद्देनिवडणूक पूर्व तयारी पूर्ण : उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांची माहिती