शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख २० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 18:09 IST

Gondia : १९५९ शेतकरी प्रतीक्षेत: २३५ कोटी ७६ लाख रुपये झाले जमा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील महायुती सरकारने गेल्यावर्षी नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात धानाला प्रतिहेक्टर २० हजार रुपये बोनस दोन हेक्टरपर्यंत देण्याची घोषणा केली होती. शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी केलेल्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार होता. यासाठी जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ८१४ शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी आतापर्यंत १ लाख २० हजार ८५५ शेतकऱ्यांच्या बैंक खात्यावर बोनसचे २३५ कोटी ७६ लाख रुपये जमा करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाकडून हमीभावाने धान खरेदी केली जाते. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या व ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाकडून प्रतिक्विंटल बोनस दिला जातो. पण गेल्या वर्षीपासून शासनाने प्रतिक्विंटलऐवजी प्रतिहेक्टरी बोनस देण्यास सुरुवात केली.

मागील वर्षी प्रतिहेक्टर १५ हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरपर्यंत बोनस दिला. तर यंदा प्रतिहेक्टर २० हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरपर्यंत बोनस दिला. यासाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणे करणे अनिवार्य होते. याकरिता जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ८१४ शेतकरी पात्र ठरले.या शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी शासनाने गोंदिया जिल्ह्याकरिता २३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यापैकी आतापर्यंत १ लाख २० हजार ८५५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बोनसची रक्कम जमा करण्यात आली आहे. तर उर्वरित १९५९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बोनसची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी विवेक इंगळे यांनी सांगितले.

रब्बीची धान खरेदी अडचणीतरब्बी हंगामातील धान पुढील महिन्यात बाजारपेठेत विक्रीस येण्यास सुरुवात होईल. पण अद्यापही खरिपातील धानाची उचल झालेली नाही. त्यामुळे रब्बी हंगामात ठेवलेला धान ठेवायचा कुठे असा प्रश्न फेडरेशनपुढे डररानपुढ निर्माण झाला आहे. त्यामुळेच अद्याप रब्बीत किती धान खरेदी केंद्र सुरू होणार हे निश्चित झालेले नाही. 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रPoliticsराजकारण