शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

‘त्या ’ माऊलीच्या हाताने भरली त्यांची ओटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST

समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवणाऱ्या ह्या माऊलीच्या हाताने भीक मागणाऱ्या मातांची ओटी सविता बेदरकर यांच्या राहत्या घरी भरण्यात आली.ज्या वस्तीमध्ये कुणी जात नाही, ते दारावर आले तरी दुसरा दरवाजा पहा अस ज्यांना म्हटले जाते. महानाईकांच्या फोटोला प्रणाम करून त्या स्त्रियांना नवीन साडीचोळी, मुलींना नोटबुक, पेन आणि जेवणाचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला.

ठळक मुद्देसाडीचोळी भेट : नवकन्यांचे भोजन गरजूंनाच दिले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कधी भीक मागून तर कधी भंगार वेचून, तर कधी कचरा वेचून उदरिनर्वाह करणाऱ्या मांगगारूडी समाज कुडवाच्या अण्णाभाऊ साठे नगरातील महिलांची ओटी आणि नवकन्याचे पूजन त्या माऊलीने केले. पती कोमामध्ये असताना अत्यंत संवेदनशील अवस्थेत आपल्या पतीचे अवयव दान करून तिने आपल्या पतीला अवयव रूपाने जिवंत ठेवण्याचे काम करणाऱ्या माऊलीचे नाव मनीषा नशिने आहे.समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवणाऱ्या ह्या माऊलीच्या हाताने भीक मागणाऱ्या मातांची ओटी सविता बेदरकर यांच्या राहत्या घरी भरण्यात आली.ज्या वस्तीमध्ये कुणी जात नाही, ते दारावर आले तरी दुसरा दरवाजा पहा अस ज्यांना म्हटले जाते. महानाईकांच्या फोटोला प्रणाम करून त्या स्त्रियांना नवीन साडीचोळी, मुलींना नोटबुक, पेन आणि जेवणाचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला. पर्यावरण पूरक हिरव्या पत्रावळी, हिरव्या साड्या खणानारळाची ओटी, स्त्रियांना गोडधोड पदार्थ देऊन त्यांची पाठवणी करण्यात आली. त्या वेळी त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते.निशिगंधाचा गजरा, पदराखाली असलेल्या मुली, आज देवीचे पूजन केल्याचं समाधान सगळ्या स्त्रियांच्या चेहºयावर दिसत होता. साधारणत: नवकन्यांचे पूजन करताना आजूबाजूच्या मुलींना जेवणासाठी बोलावले जाते. या परंपरेला फाटा देऊन ज्यांच्या जेवणाचे सदैव वांदे असतात आणि लोकांच्या तुकड्यावर ज्यांना गुजरान करावी लागते अशा समाजातील मुलींना आणि त्यांच्या आईंचे यानिमित्ताने पूजन करण्यात आले. नवीन साड्या, नवीन अलंकार, पोटात गरम-गरम अन्न गेल्याने समाधानाने त्यांचे चेहरे भरून गेले होते. तृप्तीचा ढेकर देत प्रसन्न मनाने निशिगंधाचा गजरा त्यांनी केसात माळला होता.मातृवत्सल सुहासिनीचे स्वागतपती कोमामध्ये गेल्याच दु:ख बाजूला सारून सात लोकांचा आयुष्य सजविण्यासाठी त्यांना जीवनदान देण्यासाठी जी मनीषा नशिने हिने आपल्या काळजावर दगड ठेवून इतर स्त्रियांचे सौभाग्य सुरिक्षत ठेवण्यासाठी मदत केली.आणि ती मदत अवयवाच्या रूपाने आपल्या पतीला ज्या सावित्रीने अमर करण्याचा प्रयत्न केला तिच्या हाताने ओटी भरून ह्या मातृवत्सल सुहासिनीचे स्वागत करण्यात आले. ह्या उपक्र मासाठी डॉ. सविता बेदरकर, प्रा.नीता बागडे,आरती चवारे,नानन बिसेन, यशोधरा सोनवने, मनीषा नशिने, हिमेश्वरी कावडे, वैशाली कोहपरे, शालू कृपाले ,दिव्या भगत, प्राध्यापक, तुरकर, प्रार्थना कुंभलवार यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Navratriनवरात्री