शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून चामड्याच्या पट्ट्यानं बेदम मारहाण केल्याचा तरुणाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 19:16 IST

पाच पोलिसांनी मारहाण केल्याचा तरुणाचा आरोप

मडगाव: पोलिसांनी चामड्याच्या पट्ट्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप तरुणाने केला आहे. रविवारी कुंकळ्ळी पोलिसांनी पट्ट्याने मारहाण केल्याचा आरोप 32 वर्षांच्या क्लीन्ट रिबेलोने केला आहे. या मारहाणीत सामील असलेल्या पाच पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मैदान सोडत नसल्याच्या कारणावरुन एफसी गोवा फॅन क्लबचा सदस्य लेस्टर डिसुझा या 20 वर्षीय तरुणाला आयआरबी पोलिसांकडून बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता हा दुसरा प्रकार घडला आहे. 

सोमवारी रिबेलो यांनी आपल्या पाठीवर उमटलेले पट्ट्याच्या मारहाणीचे वळ दाखवताना पोलिसांनी आपल्याला प्रथम घटनास्थळावर व नंतर पोलीस स्थानकात नेऊन मारहाण केल्याचा आरोप केला. या प्रकरणात वेळ्ळीचे सरपंच सावियो डिसिल्वा यांनीही लक्ष घातले असून या संबंधी लवकरच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली जाईल असे त्यांनी सांगितले.

रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कुंकळ्ळी पोलीस स्थानकाच्या कक्षेत येणाऱ्या एका ठिकाणी अपघात झाल्यामुळे पोलिसांनी वाहने अडवून ठेवली होती. त्यात क्लीन्ट याच्याही वाहनाचा समावेश होता. ही वाहने का अडवण्यात आली आहेत, असे पोलिसांना विचारल्यावर अपघात झाल्यामुळे असे उत्तर पोलिसांकडून त्याला मिळाले. त्यावर पोलिसांना वेड लागले आहे का, असे उद्गार क्लीन्ट याच्या तोंडातून आल्याने संतापलेल्या पोलिसांनी त्याला घटनास्थळावरच मारहाण केली, असा आरोप त्याने केला. नंतर आपल्याला पोलीस स्थानकात नेऊन चामड्याच्या पट्ट्याने मारहाण केली असेही त्याने सांगितले.

सदर घटनेनंतर त्याला बाळ्ळीच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे त्याला फारसे काही लागले नसल्याचे सांगून घरी पाठवण्याचा प्रयत्न झाला. मात्र तोर्पयत ही बातमी सगळीकडे पसरल्याने सरपंच डिसिल्वा त्याच्या मदतीला धावून आले. रात्री 12 वाजता त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सोमवारीही त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. 

टॅग्स :Policeपोलिसgoaगोवा