शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतून पळून आलेली युवती मडगावात सापडली; अखेर पालकांच्या स्वाधीन

By सूरज.नाईकपवार | Updated: October 14, 2023 15:12 IST

घरातून जाताना त्या मुलीने आपला मोबाईलही घरीच सोडला होता. त्यावर आपण घर सोडून जात असल्याचे मेसेज लिहिला होता

सूरज नाईकपवार / मडगाव  मडगाव: घरातील वडीलधाऱ्यांनी काही कारणास्तव दम दिल्याने मुंबईतून रेल्वेतून गोव्यात आलेली एक १९ वर्षीय युवती मडगावात सापडली. शुक्रवारी रात्री ही युवती मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकात गडबडलेल्या अवस्थेत फिरत असताना, गस्तीवरील पोलिसांंच्या द्ष्टिस पडली. तिची पोलिसांनी विचारपूस केली. सुरुवातीला ती काही दाद देण्याच्या तयारीत नव्हती. नंतर मात्र तिने आपले मन मोकळे करुन आपण मुंबईतील असल्याचे सांगितले.ही युवती वांद्रा मुबंई येथील आहे.

घरातून जाताना त्या मुलीने आपला मोबाईलही घरीच सोडला होता. त्यावर आपण घर सोडून जात असल्याचे मेसेज लिहिला होता. पोलिस तक्रार झाल्यानंतर सर्वत्र बिनतारी संदेश पाठवून देण्यात आला होता. कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस निता कवळेकर, आश्विती नाईक, रोशनी चाैधरी यांनी त्या युवतीला ताब्यात घेतले. व नंतर त्यासंबधी मुंबई पोलिसांना कळविण्यात आले. शनिवारी तिचे पालक येउन मुलीला ताब्यात घेउन परत निघाले.

टॅग्स :goaगोवाMumbaiमुंबईPoliceपोलिस