शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

'तुम्ही साथ द्या, गोवा स्वयंपूर्ण बनवू'; ‘सरकार तुमच्या दारी’ योजनेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2021 14:35 IST

कोलवाळ येथे ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमाच्या शुभारंभ  प्रसंगी ते बोलत होते. १९ डिसेंबर २०२० रोजी ‘स्वयंपूर्ण गोवा’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.

म्हापसा : गोवा सरकार मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास करत आहे. यासाठी केंद्र सरकारचे मोठे सहकार्य मिळत आहे. १९ डिसेंबरपर्यंत मुक्तीच्या ६० व्या वर्षी राज्य स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार  केला असून त्या दृष्टी सरकरची पाऊल पडत आहे. यासाठी राज्यातील जनतेने सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. कोलवाळ येथे ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमाच्या शुभारंभ  प्रसंगी ते बोलत होते. १९ डिसेंबर २०२० रोजी ‘स्वयंपूर्ण गोवा’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. पण महामारीमुळे लोकांपर्यंत पोहचणे शक्य झाले नाही. त्यामुळे लोकांपर्यंत जाण्याची गोव्याच्या मुक्तीची ६० वर्षे साजरी करताना जाणे योग्य असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.यावेळी मुख्य सचिव परिमल राॅय, उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय, महसूल सचिव संजय कुमार, आमदार नीळकंठ हळर्णकर, गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा, उत्तर गोवा जि.प.च्या उपाध्यक्षा दीक्षा कानोळकर, कोलवाळ सरपंच नित्यानंद कांदोळकर, पीर्ण सरपंच रिचा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.विविध खात्यांच्या १५२ हून जास्त सरकारी योजना आहेत. त्यातील अपवाद वगळता बहुतेक योजनांची माहिती लोकांना नाही. या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात व त्यांचा लाभ लोकांना व्हावा या उद्देशाने सरकार तुमच्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक गाव स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांनी विविध खात्यातील योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगारावर भर द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.यावेळी नीळकंठ हळर्णकर यांनी सरकारच्या कार्यक्रमाची स्तुती केली. ज्यावेळी आपण काँग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेश केला त्यावेळी आपण चूक केली असल्याचे वाटत होते. पण आपण जे धाडस केले त्याचे सार्थक झाल्याचे आपल्याला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. दीक्षा कानोळकर यांनी आभार मानले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाElectionनिवडणूक