शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

काल पुरस्कार, आज नमस्कार, ट्रॅफीक सेंटीनलला संतप्त ग्रामस्थांचा गराडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 20:56 IST

पोलिस खात्याने वाहतूक नियमांचा भंग करणा-यांना चपराक बसावी म्हणून ट्रॅफीक सेंटीनल नेमण्याची व्यवस्था नागरिकांमार्फत केली व यशस्वी ट्राफीक सेंटीनलना खात्यातर्फे हजारोंची बक्षिसे मिळू लागली.

पणजी - पोलिस खात्याने वाहतूक नियमांचा भंग करणा-यांना चपराक बसावी म्हणून ट्रॅफीक सेंटीनल नेमण्याची व्यवस्था नागरिकांमार्फत केली व यशस्वी ट्राफीक सेंटीनलना खात्यातर्फे हजारोंची बक्षिसे मिळू लागली तरी, काही भागात अतिउत्साही सेंटीनल हे वादाचा विषय ठरण्यास आरंभ झाला आहे. आदित्य कटारिया या सेंटीनलने आपल्या कॅमे-यात वाहतूक नियमभंगाचे सर्वाधिक गुन्हे नोंदविल्यामुळे त्याला पोलिस खात्याने शुक्रवारी 69 हजार रुपयांचा पुरस्कार दिला पण शनिवारी सांताक्रुझ भागात कटारिया यांच्यावर बाका प्रसंग ओढवला. संतप्त नागरिकांच्या तावडीतून वाचण्यासाठी लोकांसमोर त्यास हात जोडून स्वत:ची सुटका करून घ्यावी लागली.

लोक आपल्या घरातून बाहेर पडताना हेल्मेट घालत नाहीत. जर कुणी आपल्याच वाडयावरील एखाद्याच्या घरी जात असेल किंवा दुकानावर, बेकरीत, जवळच मासळी खरेदीसाठी वगैरे जात असेल तर सहज दुचाकी घेऊन जातात. मात्र भर लोकवस्तीत व भर रस्त्यावर उभे राहून नेमक्या अशा दुचाकीस्वारांना मोबाईलच्या कॅमे-यात टिपण्याचा उत्साह ट्रॅफीक सेंटीनल कटारिया याने शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास दाखवला. प्रत्येकाचेच फोटो टिपले जात आहेत असे दिसून येताच त्या परिसरातील सगळे नागरिक एकत्र आले. दुचाकीस्वारही थांबले व कटारिया यास घेराव घातला. नागरिक संतप्त झाले होते. प्रकरण हातघाईवर येईल अशी स्थिती निर्माण झाली.

तू आतिल मार्गावर का राहिला आहेस, आम्ही रोजची आमची कामे करण्यासाठी या रस्त्यावरून दुचाकीवरून फिरत असतो, तू महामार्गावर उभा राहून तेथील वाहतूक नियमभंगाचे फोटो काढ असे सल्ले नागरिकांनी कटारिया याला दिले. शेवटी कटारिया याने अक्षरश: हात जोडले. आपण पुन्हा असे करत नाही असे सांगत त्याने नागरिकांपासून स्वत:ची सुटका करून घेतली. कटारिया यास नावाने कुणी ओळखत नव्हते. काही नागरिकांनी मध्यस्थी करत कटारिया यास जाऊ द्यावे असा सल्ला दिला. मात्र दुस:यावेळी अशा छोटया वाडयांवर आणि भर वस्तीतील अंतर्गत रस्त्यांमध्ये दुचाकीस्वार आणि अन्य वाहनधारकांचे फोटो काढू नका असे सल्लेही कटारिया यास दिले गेले. 

दरम्यान, वाहतूक नियमांचा भंग करणा-या वाहनांचा फोटो काढून तो वॉट्स अॅपद्वारे पोलिसांना पाठविणा-या ट्रॅफीक सेंटीनलना हजारो रुपयांची बक्षिसे देणो पोलिस खात्याने सुरू केल्यानंतर हजारो छायाचित्रे पोलिसांना मिळू लागली आहेत व सेंटीनलना नियमितपणो हजारो रुपयांचे पुरस्कारही प्राप्त होऊ लागले आहेत.

टॅग्स :goaगोवा