शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रुबी निकालास हायकोर्टात आव्हान देण्यास मुहूर्त मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 17:32 IST

गोव्यातील रुबी रेसिडन्सी प्रकरणात मडगाव न्यायालयाने या प्रकरणातील दहा संशयितांना निर्दोष मुक्त केले.

ठळक मुद्दे4 जानेवारी 2014 रोजी चावडी-काणकोण येथील ही सहा मजली इमारत कोसळली होती. या प्रकरणात एकूण 11 संशयितांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.  गोव्यातील रुबी रेसिडन्सी प्रकरणात मडगाव न्यायालयाने या प्रकरणातील दहा संशयितांना निर्दोष मुक्त केले. काणकोण येथे झालेल्या या दुर्घटनेत 31 कामगारांचा बळी गेला होता तर 21 कामगार जखमी झाले होते.

मडगाव - गोव्यातील रुबी रेसिडन्सी प्रकरणात मडगाव न्यायालयाने या प्रकरणातील दहा संशयितांना निर्दोष मुक्त केले. याला एक वर्ष उलटले तरी केवळ गोवा सरकारकडून मान्यता न मिळाल्यामुळे या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यास अद्याप या प्रकरणात तपास करणाऱ्या क्राईम ब्रँचला मुहूर्त मिळालेला नाही.

काणकोण येथे झालेल्या या दुर्घटनेत 31 कामगारांचा बळी गेला होता तर 21 कामगार जखमी झाले होते. सत्र न्यायालयाच्या निवाड्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्याइतपत प्रकरणात मुद्दे असल्याचा सल्ला अभियोग संचलनालयाने देऊनही अद्याप सरकारकडून त्यासाठी मान्यता मिळालेली नाही. आम्ही सरकारकडून आदेश येण्याची वाट पाहतो अशी माहिती क्राईम ब्रँचच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.क्राईम ब्रँचचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सत्र न्यायालयाच्या आदेशावर खात्याने अभियोग संचालकांचा सल्ला मागितला होता. सदर प्रकरणात उच्च न्यायालयाकडे दाद मागता येते असा सल्ला अभियोग संचालकांनी दिल्यानंतर ही फाईल सरकारला पाठवून दिली होती.

4 जानेवारी 2014 रोजी चावडी-काणकोण येथील ही सहा मजली इमारत कोसळली होती. या प्रकरणात एकूण 11 संशयितांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र भ्रष्टाचाराचे खटले हाताळणारे दक्षिण गोव्याचे खास न्यायाधीश बी.पी. देशपांडे यांनी कंत्राटदार विश्वास देसाई याला वगळता इतर दहाही संशयितांना आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त केले होते. या दहा संशयितांमध्ये दीपक देसाई, प्रशांत शिरोडकर, रमेश नाईक, प्रदीप नाईक, अजय नाईक़ देसाई, अशांक नाईक गावकर, सुहास फळदेसाई व प्रशांत बांदोडकर तसेच दोन बिल्डर परदीप सिंग बिरिंग व जगदीपकुमार सैगल यांचा समावेश होता. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी व्ही. के. झा यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला होता. या आयोगाने ही दुर्घटना घडण्यामागे इमारतीचे सदोष डिझाईन, घाईगडबडीत उरकलेले काम आणि सदोष साहित्याचा वापर असल्याचे नमूद केले होते.

 

टॅग्स :goaगोवा