शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रकाळात राज्याला महिला पोलिसांचे 'कवच'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2024 11:00 IST

पिंक फोर्सची महत्त्वाची भूमिका, मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नवरात्रोत्सव काळात राज्यातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी महिला पोलिसांनीच उचलली आहे. त्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी पिंक फोर्ससह सर्वच महिला पोलिसांशी संवाद साधला. यावेळी सुरक्षेबाबत आखण्यात आलेल्या या नव्या उपाययोजनेची महिला पोलिस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.

बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी पोलिस मुख्यालयाला भेट देऊन महिला कॉन्स्टेबलपासून अधीक्षकांपर्यंतच्या सर्वच महिला पोलिसांशी संवाद साधला. यावेळी महिला अधीक्षक सुनीता सावंत, सुचेता देसाई, एझिल्डा डिसोझा तसेच सर्व महिला पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक आणि इतर महिला पोलिस उपस्थित होत्या.

नवरात्रोत्सव काळात अनेक ठिकाणी दांडिया आणि गरबा नृत्याचे कार्यक्रम होतात. अशावेळी समाजविघातक प्रवृत्तींना रोखण्यासाठी महिला पोलिसांकडून विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. कायदा-सुव्यवस्थेसंबंधी काहीही प्रसंग उ‌द्भवला तर तो कसा हाताळावा याबद्दल सर्व तयारी ठेवण्यात आली आहे. विशेषतः पिंक फोर्सची या कामात महत्त्वाची भूमिका राहणार आहे. याची सर्व माहिती महिला पोलिस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. नवरात्रौत्सवात पोलिस प्रशासनाने राज्यभरात केलेल्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेत काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महिला पोलिसांशी साधलेल्या ३० मिनिटांच्या संवादात महिला पोलिसांच्या क्षमतेचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन दिले. महिला या महिलांच्या अडचणी अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात. शिवाय फिल्डवर काम करताना पुरुषांपेक्षा कुठेही कमी पडत नाहीत. पिंक फोर्सच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. सुरक्षेचे प्रबंध म्हणून ज्या काही योजना त्यांनी बनविल्या आहेत, त्याची अंमलबजावणी तितक्याच चांगल्या पद्धतीने होईल याबद्दल आपल्याला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. एका महिला अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा संवाद केवळ एकतर्फी नव्हता तर महिलांनीही मुख्यमंत्र्यांशी मुक्त संवाद यावेळी केला.

जागृती करणार 

ही व्यवस्था नवरात्रोत्सवासाठी करण्यात आली असली तरी त्यानंतरदेखील ही यंत्रणा कार्यरत राहील, असे एका महिला अधिकाऱ्याने सांगितले. शाळा व महाविद्यालयांतही जाऊन सुरक्षेविषयी जागृती करण्याचा या उपक्रमात समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी महिला पोलिसांच्या या योजनेचे कौतुक केले आहे.

अत्याचारांना बसणार आळा 

महिला पोलिसांशी संवाद साधल्यानंतर पोलिस मुख्यालयातून बाहेर पडताना पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी नवरात्रोत्सवानिमित्त पिंक फोर्ससह महिला पोलिसांशी झालेल्या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्याचे सांगितले. त्यांची तयारी पाहून आपण विश्वासाने सांगू शकतो की या नव्या उपाययोजनेमुळे महिलांवरील अत्याचारांना आळा बसणार आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसPramod Sawantप्रमोद सावंत